- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोविडची लस घेणाऱ्या पहिल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या डॉक्टरांनी लस घेऊन कोविड लसीचा प्रारंभ केला त्यात अंबरनाथमधील या डॉक्टरांचा समावेश होता. त्या डॉक्टरांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही त्या सुरक्षित राहू शकल्या नाहीत हे आता उघड झाले आहे.अंबरनाथ व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी वाडेकर यांनी कोविड काळात फ्रंटवर राहून कोविडवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कोविड काळात झपाटून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी यांना कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान पहिली लस घेण्याचा मान देण्यात आला होता. ही लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लसही त्यांनी घेतली. पहिली लस घेतल्यावर त्या स्वतःला सुरक्षित समजत होत्या. कोरोनाची लस घेतल्यावर कोविडची लागण होणार नाही, अशी समजूत प्रत्येकाला होती. मात्र डॉ. शुभांगी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यांना कोविडची लक्षणे आढळल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरू केले आहेत. मात्र ज्या डॉक्टरांनी कोविडची पहिली लस घेऊन लसीकरणाचा प्रारंभ केला त्याच डॉक्टर कोविडपासून सुरक्षित राहू न शकल्याने आता या लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. २०० ते २५० जण घेतात रोज लसलसीकरणाच्या मोहिमेदरम्यान रोज दोनशे ते अडीचशे नागरिक लस घेत आहेत. मात्र लसीचे दोन डोस झाल्यानंतरही नागरिक १०० टक्के सुरक्षित राहतील याची हमी आता कोणीही देऊ शकत नाही, हे डॉक्टर शुभांगी यांच्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.
पहिली लस घेणाऱ्या डॉक्टरच निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:16 AM