लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालकेच्या स्थायी समितीमध्ये महापौर निधीवरून भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांना महापौर नरेश म्हस्के यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या मागणीमुळेच शहरातील कट्ट्यांना महापौर निधी दिला. तो कोविड पूर्वीचा असल्याचे सांगत कट्ट्यांवर दहा नव्हे तर केवळ साडेचार कोटींचाच खर्च झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांचा अभ्यास कच्चा असून महापौर निधीची मागणी करण्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवांसाठी निधी मिळत नसतांना, त्यांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविले जात असतांना, महापौर निधीतून शहराच्या विविध भागात तब्बल दहा कोटींचा चुराडा करु न कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शुक्र वारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी केला होता. नगरसेवक कृष्णा पाटील यांनी हा प्रश्न स्थायीच्या बैठकीत उपस्थित केला होता. यावर महापौर म्हस्के यांनी भाजप नगरसेवकांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या मागणीनुसारच कट्ट्यांसाठी हा महापौर निधी दिला गेला आहे. असा निधी मागण्यांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा देखील समावेश असून हा निधी देताना कोणत्याही प्रकारे पक्षीय भेद केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. २०१९ -२०२० या आर्थिक वर्षात केवळ सात कोटींचा महापौर निधी मिळाला असून यामधूनच साडेचार कोटींचा निधी कट्ट्यांवर खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले. २०२०-२१ मध्ये महापौर निधी मिळालाच नसल्याने सर्व नगरसेवकांना निधी देणे कठीण होते. मात्र,तरीही जेवढा निधी मिळाला तेवढा सर्वच नगरसेवकांना दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.* महापौरांच्या प्रभागात हजारो कोटींची कामे ...आपल्या प्रभागात १०० कोटींची नव्हे तर हजारो कोटींची कामे सुरु आहेत. भाजपच्या नगरसेवकांचा अभ्यास कच्चा असल्याचा टोलाही महापौरांनी लगावला आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो आणि क्लस्टर अशा विविध माध्यमातून हजारो कोटींची कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रभागात झालेली कामे पुन्हा करावी लागत नाहीत. इथल्या प्रभागातील शौचालयांच्या झालेल्या कामाचे उदाहरण थेट दिल्लीत दिले जात असून या सर्व कामांचा आपल्याला अभिमान असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.
कट्ट्यांवर केवळ साडेचार कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 12:07 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालकेच्या स्थायी समितीमध्ये महापौर निधीवरून भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांना महापौर नरेश म्हस्के यांनीही ...
ठळक मुद्देनगरसेवकांच्या मागणीमुळेच दिला महापौर निधी भाजपच्या नगरसेवकांना महापौरांचे प्रत्युत्तर