लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहने ही ठाण्यातून जात असून याचा विपरित परिणाम ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीवर होत आहे. तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शहराबाहेरून वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कोपरी ते पटणी आणि गायमुख ते खारबाव हे खाडीपूल तसेच कोपरी-साकेत, गायमुख, कोस्टलमार्ग, एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित करावेत, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.मागील दोन ते तीन दशकांपासून ठाण्याचे नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. या अनुषंगाने वाहनांच्या संख्येतदेखील लक्षणीय वाढ होत आहे. बाहेरील भागातून मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहने ही ठाण्यातून जात असल्याने गेल्या चारपाच वर्षांपासून ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीवर ताण येत आहे.परिणामी, ठाणेकरांना नाहक या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रदूषणाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून मुंबईमध्ये येणारी व मुंबईतून बाहेर जाणारी वाहने ठाण्यातून न जाता परस्पर वळविल्यास ठाण्यातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होऊन इंधनाचीदेखील बचत होईल, असा उतारा महापौरांनी शोधला आहे.महापौरांनी सुचविलेले पर्यायठाण्यातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कळव्यातून येजा करावी लागते. यामुळे कळवा खाडीपुलावर सातत्याने वाहतूककोंडी होत असून कोपरी ते पटणी कंपनीपर्यंत खाडीपूल तयार केल्यास ठाण्याहून नवी मुंबईला कमी अंतराचा थेट मार्ग उपलब्ध होईल. एमएमआरडीएने हा पूल बांधावा, अशी मागणी त्यांनी केली.च्तसेच मुलुंडपर्यंत विस्तारित होणाºया पूर्वमुक्त मार्गापासून कोपरी-साकेतमार्गे गायमुखपर्यंत कोस्टल रोड तयार केल्यास ठाण्याच्या बाहेरून वाहतूक होऊन त्याचा त्रास अंतर्गत वाहतुकीला होणार नाही, याचा तातडीने डीपीआर तयार करण्याची मागणी त्यांनी केली.त्याचबरोबर गायमुख ते खारबाव खाडीमार्ग तयार केल्यास घोडबंदर रोडवरील बरीचशी वाहतूक कमी होऊन भविष्यात निर्माण होणाºया नवीन ठाण्याला याचा लाभ होईल. याबाबत, महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. एमएमआरडीएने रिजनल प्लानमध्ये या पुलाचा समावेश केला असून त्याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे.
वाहतूककोंडीवर खाडीपुलांसह सागरीमार्ग हाच उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:34 PM