शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

ठाण्यात दहा टक्केच रेस्टॉरंट्स, बार उघडले; संध्याकाळी ७ नंतरच्या बंदच्या आदेशाने हॉटेल्स व्यवसायिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 6:47 PM

Thane Newsअनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे .

 ठाणेहॉटेल्स, बार आणि रेस्टोरेंट ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी,सात नंतरच खरा व्यवसाय असल्याने हॉटेल्स व्यवसायिकांकडून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी परवानगी देऊनही ठाण्यात सोमवारी १० टक्के सुद्धा रेस्टोरेंट आणि बार उघडले नव्हते. मार्चपासून या सर्व आस्थापना बंद असल्याने पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही , आहेत त्या स्टाफला पूर्ण पगार द्यावा लागलं असल्याने जर संध्याकाळी ७ नंतर हॉटेल्स बंद होणार असतील तर उघडण्यात तरी काय अर्थ आहे असा प्रश्न रेस्टोरेंट व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. 

अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात  केंद्र व राज्य शासनाने अनेक व्यावसायिकांना सूटदिली आहे ,अखेर हॉटेल आणि बार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे . असे असले तरी केंद्र व राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निर्णायक अधिकार दिले आहेत ,महापालिका अथवा नगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची व्याप्ती बघून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अखत्यारीत आवश्यक ते निर्णय घ्यायचे आहेत .ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटेल आणि  रेस्टॉरंट बार सुरु करताना महापालिकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून हॉटेल व्यावसायिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार  आहे .ठाणे महापालिकेच्या निर्देशां नुसार व्यावसायिक आपल्या क्षमतेच्या  पन्नास टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देऊ शकतात  तसेच संध्याकाळी सात च्या  आत हॉटेल ,रेस्टॉरंट बंद करणे आवश्यक आहे या निर्णया मुळे हॉटेल  व्यावसायिकां मध्ये नाराजी आहे ,संध्याकाळी सात च्य नंतर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये ग्राहक येण्यास सुरवात होते असे असताना त्या वेळेत हॉटेलला टाळे कसे मारणार ? असा त्यांचा  प्रश्न  आहे .तसेच निर्धारित वेळेत बनवण्यात आलेले पदार्थ विकले न गेल्यास संध्याकाळी सात नंतर ते पदार्थ फेकून देण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था होणार आहे.

दरम्यान हॉटेल रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बरेच हॉटेल व्यावसायिक सध्या लगेच व्यवासाय सुरु करण्याच्या मानसिकतेत नसून कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने त्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा आहे . मुख्य म्हणजे व्यवसायाला लागणारा  मोठ्या प्रमाणात  कुशल कर्मचारी वर्ग कुठून आणायचा हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. 

हॉटेल्स व्यवसायिकांनी हॉटेल्स केली बंद .... बरेचसे कर्मचारी परराज्यात आपल्या गावी परतले असल्याने त्यांना त्वरित कामावर बोलावणे शक्य होणार नसल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार आहे.कोरोना संक्रमण काळात वाढत चाललेला लॉकडाऊनचा कालावधी बघून भाडे तत्वावर असलेल्या हॉटेल मालकांनी भाडे भरण्या पेक्षा हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरात अनेक हॉटेल बंद झाली आहेत .  ठाणे शहरात हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय अनलॉक  असला तरी व्यवसाय पूर्वपदा येण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक देत आहेत. 

मॉलमधील आस्थापनांना मात्र रात्री ११ पर्यंतची वेळ ... शहरातील हॉटेल्स,बार आणि रेस्टोरेंटला एकीकडे ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंतच व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी दुसरीकडे मॉलमधील आस्थापनांना मात्र वेगळे नियम आहेत का ? असा प्रश्न हॉटेल्स व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे. मॉल मधील काही आस्थापनांच्या वतीने रात्री ११ पर्यंत आस्थापना सुरु राहणार असल्याचे फलक लावण्यात आले असल्याची माहिती हॉटेल्स व्यवसायिकांनी दिली आहे. 

व्यवसाय करायचा कसा ?" एक तर मार्च पासून हॉटेल्स बंद आहेत त्यामुळे स्टाफ देखील पुरेसा नाही. याशिवाय संध्यकाळी ७ नंतरच ग्राहक येण्याची वेळ असल्याने यावेळीच जर हॉटेल्स बंद करायची आहेत तर मग कोणता व्यवसायिक हॉटेल्स उघडेल. त्यामुळे बहुतांश व्यवसायिकांनी हॉटेल्स न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यवसायिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून किमान रात्री ९ पर्यंत तरी परवानगी द्यावी . - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोशिएशन

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलthaneठाणे