ठाणे - सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९ आॅगस्टचा बंद ठाण्यात असणार नाही. या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत शहरातील विविध ६ ठिकाणी २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे समन्वय समितीने स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नाही. समाजातील तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय सर्वानुमते ७ आॅगस्ट रोजी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुतात्म्यांना सकाळी १० ते ११ वा. या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अष्टविनायक चौक (कोपरी), कळवा नाका, वर्तकनगर नाका, वागळे प्रभाग समिती, सुरज वॉटर पार्क (वाघबीळ) या सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्तारोको अथवा घोषणाबाजी होणार नसल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले.
ठाण्यात मराठा समाज वाहणार केवळ श्रध्दांजली, शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद असणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:27 PM
मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टचा बंद पाळला जाणार नाही. यावेळी, केवळ २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देसहा ठिकाणी वाहीली जाणार श्रंध्दाजलीबैठकीत घेतला गेला निर्णय