लोकमत न्यूज नेटवर्कवसई : राज्यातील अत्यावश्यक सेवा म्हणून महत्त्वाच्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्याचप्रकारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी अशा गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांनाही मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी लोकल ट्रेनच्या प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. वसई, विरार, नालासोपारा भागांत बविआने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला धान्य तसेच आर्थिक मदत केली. या परिसरातील बहुतांश गंभीर आजारांच्या रु ग्णांची मुंबईतील केईएम, जे.जे., टाटा, नायर, भगवती यासारख्या रु ग्णालयांत उपचार सुरू आहेत. पण, सार्वजनिक परिवहन सेवा बंद असल्याने या आजाराने त्रस्त रु ग्णांचे हाल सुरू होते.
जुलैमध्ये सरकारने अनलॉक-१ ची प्रक्रि या सुरू केली. त्याचा भाग म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. यामध्ये गंभीर आजारांच्या रुग्णांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे वसई-विरारच नव्हे, तर मुंबईची उपनगरे तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, आसनगाव, वाशी, बेलापूर आणि पनवेल आदी ठिकाणच्या रु ग्णांना मुंबईत उपचारासाठी येणे अवघड झाले. त्यामुळे अनेकांचा घरातच मृत्यू झाला.हितेंद्र ठाकूर यांनी रेल्वेच्या सर्व बड्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही पत्रआमदार क्षितिज ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहून गंभीर आजाराच्या रु ग्णांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती बविआने पत्राद्वारे केली आहे.