शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागरिकांच्या सोयीसाठी पदपथ मोकळे करा-पी. वेलारासू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 7:25 PM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिले आहे.

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिले आहे. आज पार पडलेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका अधिकारी व प्रभाग अधिका-यांच्या प्रभावी फेरीवालाविरोधात कारवाई राबविल्याने आयुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांना केवळ स्टेशन परिसर मोकळा नको आहे तर त्यांच्या चालण्यासाठी तयार केलेले पदपथही मोकळे हवे आहेत. सर्व प्रभाग अधिका-यांनी पदपथ मोकळे करण्याची कारवाई करावी. ज्या दुकानदारांनी पदपथ काबीज करून व्यवसाय थाटला आहे. अशा दुकानदारांनी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा महापालिका कारवाई करणार आहे. या कारवाईचा खर्चही महापालिका संबंधित दुकानदारांकडूनच वसूल करणार आहे. याची अतिक्रमण करणा-या दुकानदारांनी दक्षता घ्यावी असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. महापालिकेकडे हस्तांतरित झालेले व आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्यात यावेत.नगररचना विभागाने अशा आरक्षित व महापालिकेस हस्तांतरित झालेल्या भूखंडाची यादीच प्रभाग अधिका-यांना उपलब्ध करून द्यावी. ज्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणो झालेली आहेत. ते भूखंड या महिन्याअखेरीस मोकळे करीन द्यावेत. त्यावरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मोहिम हाती घ्यावी. मालमत्ता करवसुलीचा आढावा घेताना ज्या मोबाईल टॉवर कंपन्यांनी त्याचा कर महापालिकेकडे भरलेला नाही. त्या मोबाईल टॉवरच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी कर निर्धारक व संकलक अनिल लाड यांना दिले आहे. महापालिकेच्या अनेक पदपथांवर अतिक्रमण आहे. अनेक पदपथावर चायनीज गाड्यांनी त्यांचे हॉटेल थाटले आहे. तसेच वडापावच्या गाड्या सुरू आहेत. आयुक्तांच्या आदेशापश्चात त्यांचे धाब दणाणले आहेत. अनेक दुकानदारांनी त्यांच्या शेड पदपथावर आणलेल्या आहेत. त्यांच्या शेडने पदपथ व्यापलेले आहेत. याशिवाय त्यांचे सगळे साहित्य त्यानी पदपथावर ठेवले आहे. त्यामुळे पादचा-यांना पदपथ असूनही त्याचा वापर करता येत नाही. पुन्हा रस्तावरून चालत जीव धोक्यात घालूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. हे चित्र कल्याण, डोंबिवली स्टेशन परिसरात नियमित पाहावयास मिळत आहे. आयुक्तांच्या आदेशापश्चात किती पदपथ मोकळे होती याकडे पादचा-यांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांच्या आदेशाचे महापालिका वर्तुळातून स्वागत होत आहे. मनसेच्या इशा-या पश्चात महापालिका हद्दीतील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर सुरू असलेली रेल्वे व महापालिकेची कारवाई ही सातत्य ठेवून आहे. त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. परिसर फेरीवालामुक्त झाला असला तरी आता मोकळ्य़ा जागेत रिक्षा चालकांचा शिरकाव वाढला आहे. त्यामुळे वाहतूक व आरटीओने बेशिस्त व रस्ता व्यापणा-या, वाहतूक अडथळा निर्माण करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. महापालिका व रेल्वे सक्रिय झालेली असताना आता आरटीओ व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यात मोकळ्या जागेत रिक्षा चालकांचे फावले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका