शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खुलेआम धिंडवडे, पण दाखल गुन्हे कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:29 AM

मीरा-भाईंदरमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंगाचे दोन दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते.

- धीरज परबमीरा-भाईंदरमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंगाचे दोन दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीतसुद्धा दोन दखलपात्र व पाच अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे तब्बल ११ गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय, दोन अदखलपात्र गुन्हे दाखल होते. पण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन दखलपात्र आणि दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.२०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकही गुन्हा दाखल झाला नसला, तरी आचारसंहितेचा भंग झालाच नाही, असे मानण्याचे कारण नाही. कारण, अनेक तक्रारी होऊनसुद्धा गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शांती पार्कमधील सभा ही संपूर्ण रस्ता बंद करून घेण्यात आली होती. पण, तक्रारी होऊनसुद्धा कारवाई काहीच झाली नव्हती. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन नगरसेवक आणि स्थानिक भाजपाची धुरा हाती असलेले नरेंद्र मेहता यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. पालिकेचे प्रभाग अधिकारी असलेले स्वप्नील सावंत यांच्या तक्रारीवरून सीडीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या सीडीद्वारे गुजराती, मारवाडी, जैन मतदारांनी आपणास मतदान करावे, म्हणून त्यात जनावरांच्या हत्या करताना दाखवले होते. त्या हत्यांच्या चित्रणाचा हवाला देऊन पुढे मेहता हे मतदारांना आवाहन करताना दिसत होते. न्यायालयाने या प्रकरणातून मेहतांना दोषमुक्त केले होते. अगदी, २०१७ च्या पालिका निवडणूक काळात धार्मिक द्वेष वाढवून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी धर्मगुरूंचा वापर, अनेक पत्रके आणि क्लिप सर्रास वाटल्या गेल्या; पण एकही गुन्हा दाखल केला गेला नाही.आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी केल्या, तरी त्याचा अहवाल पाठवणारे वा कारवाई करणारे हे स्थानिक अधिकारीच असतात. त्यांचे राजकारण्यांशी लागेबांधे असल्याने तक्रारी करूनसुद्धा गुन्हा दाखल केला जात नाही. खोटे, दिशाभूल करणारे अहवाल दिले जातात. जास्तच दबाव असला, तर कारवाई होते. अन्यथा, कितीही तक्रारी केल्या तरी यंत्रणेस फरक पडत नाही. दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा पुढे तपास आणि न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी यंत्रणेकडूनच गांभीर्य दाखवले जात नाही.मीरा-भार्इंदरमध्ये आचारसंहिता भंगाच्या तक्रारी मोठ्या संख्येने येत असल्या, तरी गुन्हे मात्र नाममात्रच दाखल होत आले आहेत. त्यातही दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षा आजवर कुणालाच झाली नसून, आरोपी सहीसलामत सुटून मोकळे होत आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे कायदे, गुन्हे दाखल करणारे फिर्यादी अधिकारी आणि तपास यंत्रणा यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाईच होत नसती, तर लोकशाहीच्या या उत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना जरब बसणारच कशी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक