शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

ऑपरेशन ऑल आऊट! ठाणे पोलिसांनी रातोरात केली १८४ आरोपींना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: November 24, 2022 8:52 PM

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. २८५ अधिकारी आणि एक हजार ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंळामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट या विशेष मोहीमेद्वारे तब्बल १८४ आरोपींची धरपकड केली. या मोहीमेमध्ये २८५ अधिकाऱ्यांसह एक हजार ३११ पोलीस अंमलदार सहभागी झाले आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २४ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सह पोलीस आयुक्त दतात्रय कराळे, अपर आयुक्त डॉ. पंजाब उगले, ठाण्याचे पोलीस उपायुक्त  गणेश गावडे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अमरसिंग जाधव, भिवंडीचे नवनाथ ढवळे यांच्यासह सर्व उपायुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले. अचानक चार ते पाच तासांच्या या अभियानात १७७ गुन्हे दाखल झाले असून यात  १८४ जणांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. यामध्ये अवैध शस्त्र बाळगणारे १२, तडीपार असूनही पुन्हा बेकायदेशीरपणे फिरणारे १६, बेकायदेशीर दारु विक्री करणारे ६८, जुगार खेळणारे नऊ, अंमली पदार्थांची विक्री करणारे ३५ तसेच वॉन्टेड दहा अशा १८४ जणार अटक केली. 

अशी आहे वाहतूक पोलिसांनी कारवाई याचदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक शाखेनेही २३ अधिकारी आणि ११८ पोलीस कर्मचारी यांच्या फौजफाटयाच्या मदतीने एक हजार ६५३ केसेस नोंदवून १० लाख ७ हजार २०० रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. यात तब्बल १० लाख८० हजार ५५० रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेटच्या ५९५ चालकांकडून तीन लाख १७ हजारांचा दंड वसूल केला.  तर विना सीट बेल्टच्या २३४ प्रवाशांकडून ५३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल झाला. त्याचबरोबर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ९१ चालकांवरही खटले भरण्यात आले. 

त्यापाठोपाठ सिग्नल तोडणारे ४५, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ३४ जणांवरही कारवाई करण्यात आली. ३०१ इतर कारवाईत एक लाख ८० हजार ५५० तर २२२ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ७७ हजार २०० तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या ४२ चालकांकडून १ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या दंड वसूलीची कारवाई केली.