शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

संभाव्य यादीत आयारामांना संधी

By admin | Published: February 03, 2017 3:21 AM

बंडखोरीची शक्यता प्रत्येक पक्षाला भेडसावत असल्याने अद्याप एकाही प्रमुख पक्षाने आपली यादी जाहीर केलेली नाही. परंतु, यात भाजपाची संभाव्य किंबहुना

ठाणे : बंडखोरीची शक्यता प्रत्येक पक्षाला भेडसावत असल्याने अद्याप एकाही प्रमुख पक्षाने आपली यादी जाहीर केलेली नाही. परंतु, यात भाजपाची संभाव्य किंबहुना ८० टक्के पक्की असलेली यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये शिवसेनेतून अनेक जण आपल्याकडे येणार, असे गृहीत धरून त्यांच्यासाठी काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत, तर नारायण पवार, अशोक राऊळ यांची नावे यादीत असून राऊळ यांनी अद्यापही भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. तर, कळव्यातील गणेश साळवी यांनीदेखील शिवसेना सोडली नसतानाही त्यांच्या पत्नीचेही नाव या यादीत आले आहे. तसेच सुधाकर चव्हाण यांचे नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना भाजपाने तिकीट पक्के केले आहे. रिपाइंच्यादेखील सहा उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. तसेच आयारामांवरदेखील विशेष कृपा केली आहे.ठाण्यात खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच काहीशी लढत होणार असली तरी आज पाचही प्रमुख पक्षांनी आपली यादी बंडखोरी अटळ असल्याने अद्यापही जाहीर केलेली नाही. अशातच भाजपाने अंतिम मंजुरीसाठी तयार केलेली संभाव्य यादी बाहेर आली असून शिवसेनेतून काही मासे गळाला लागू शकतात, ही अपेक्षा बाळगून काही ठिकाणचे उमेदवार घोषित केलेले नाहीत. यामध्ये प्रभाग क्रमांक ४, ५, ७ आणि ३३ चा समावेश असून या ठिकाणी इतर पक्षांतील मासे गळाला लावण्याचा विचार भाजपाचा सुरू आहे. प्रभाग क्रमांक १८ ड, २९ मध्ये ब, क आणि ड तसेच प्रभाग क्रमांक ३२ मध्ये ब या ठिकाणचे उमेदवारही निश्चित नाहीत. तसेच कळव्यातील उमेश पाटील यांनादेखील भाजपाने गृहीत धरून त्यांचा प्रवेश झाल्यास हर्षला बुबेरा यांचे नाव सोडून इतर नावांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले नारायण पवार यांचे नावदेखील यादीत निश्चित केले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचा अद्याप प्रवेश झाला नसतानादेखील त्यांचे नाव यादीत आहे. दुसरीकडे लक्ष्मण टिकमाणी यांच्या जागी त्यांच्या मुलाचे नाव यादीत आहे. दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेतून आलेल्या आयारामांपैकी बहुतेक सर्वांचीच नावे यादीत समाविष्ट केली आहेत. हंडोरे, सुधाकर चव्हाण, सीताराम राणे आदींसह काही नावे अद्यापही यादीत दिसलेली नाहीत. त्यामुळे यातील कोणाला तिकीट पक्के केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनादेखील यादीत स्थान दिले असून देवराम भोईर यांचा पराभव करणारे तथा शिवसेनेतून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले लॉरेन्स डिसोझा यांचे नाव यादीत आहे. याशिवाय शारदा पाटील, जयनाथ पूर्णेकर आदींसह इतर काही महत्त्वाची नावे या यादीत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून भाजपात प्रवेश केलेल्या गोकूळनगरच्या पाटील दाम्पत्याचाही या यादीत समावेश आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मुंब्य्रामध्येदेखील मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन भाजपा नशीब आजमावणार आहे. दुसरीकडे, उल्हासनगरमध्ये रिपाइं (आठवले गटाने) शिवसेनेला टाळी दिली असताना ठाण्यात अद्यापही रिपाइंने कोणाला टाळी द्यायची, याचा निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा, भाजपाने सहा जागा दिल्या असून यामध्ये रिपाइंचे ठाणे शहराध्यक्ष रामभाऊ तायडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांना संजय घाडीगावकरांच्या पॅनलमध्ये स्थान दिले आहे. काही जणांनी इतर पक्षांतून भाजपात प्रवेश केला असला, तरी त्यांचेदेखील तिकीट कापण्यात येत असल्याचे या यादीतून दिसून येत आहे. त्यामुळे याचा परिणाम बंडखोरी होण्यात होऊ शकतो. (प्रतिनिधी)- २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता स्थापनेच्या वेळेस ज्या एका महिलेमुळे अख्खे ठाणे बंद करण्यात आले होते, त्या सुहासिनी लोखंडे यांना मात्र या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आशा शेरबहादूर सिंग यांचाही पत्ता कापण्यात आला आहे. तसेच राजकुमार यादव यांच्याऐवजी त्यांच्या आईला या यादीत स्थान दिले आहे.प्रभागवार भाजपाची यादी प्रभाग क्र.१अ) राम ठाकूर, ब) पुरुषोत्तम पाटील, क) सुनीता वड किंवा पार्वती हंबीर आणि ड) योगिता पाटीलप्रभाग क्र. २अ) कमल चौधरी, ब) कविता पाटील, क) मनोहर डुंबरे आणि ड) अर्चना मणेराप्रभाग क्र. ३अ) सुषमा दळवी किंवा नंदा चव्हाण (रिपाइं), ब) जयनाथ पूर्णेकर, क) इंदिरा मढवी आणि ड) रमाकांत पाटीलप्रभाग क्र. ६अ) विद्या शिंदे, ब) निलेश पाटील, क) जागृती विचारे आणि ड) जगन्नाथ राऊतप्रभाग क्र. ८अ) निलेश पाटील, ब) श्वेता अमित नायर, क) शारदा पाटील आणि ड) लॉरेन्स डिसोझाप्रभाग क्र. ९अ) भाऊ कांबळे (नगरसेवक उमेश पाटील आल्यास हर्षला बुबेरा वगळून इतर नावे कापण्यात येणार) ब) हर्षला बुबेरा, क) अंकिता जामदार आणि ड) संतोष जोशीप्रभाग क्र. १०अ) दिलीप कांबळे, ब) रत्नप्रभा पाटील, क) जयश्री बिराजदार आणि ड) प्रवीण रानडेप्रभाग क्र.११अ) दीपा गावंड, ब) नंदा पाटील, क) कृष्णा पाटील आणि ड) मिलिंद पाटणकरप्रभाग क्र. १२अ) नारायण पवार, ब) गुणीजन, क) प्रतिमा केदारी आणि ड) अशोक राऊळप्रभाग क्र. १३अ) कैलास पाटील, ब) तृप्ती जोशी पाटील, क) समिरा भारती आणि ड) भूषण पाटीलप्रभाग क्र. १४अ) बाळा केंद्रे किंवा सचिन पाटील, ब) बबिता सिंह, क) मनीषा बर्गे आणि ड) मयूरेश जोशीप्रभाग क्र. १५अ) सुवर्णा कांबळे, ब) वर्षा पाटील, क) केवलादेवी यादव आणि ड) विलास कांबळेप्रभाग क्र. १६अ) पुष्पा भालशंकर किंवा अर्चना कांबळे, ब) कल्पना पाटील, क) रिक्त आणि ड) सुनील कोळपकरप्रभाग क्र. १७अ) रिक्त, ब) रिक्त, क) रिक्त आणि ड) रामभाऊ तायडे (रिपाइं)प्रभाग क्र. १८अ) गीता देशमुख, ब) स्नेहल पाटील किंवा वंदना जाधव क) रिक्त आणि ड) रिक्तप्रभाग क्र. १९अ) पूजा गद्रे, ब) भाग्यश्री गाडे (रिपाइं), क) जनार्दन खेतले आणि ड) मिलिंद बनकरप्रभाग क्र. २०अ) सुबोध ठाणेकर, ब) रेखा पाटील, क) किरण टिकमाणी आणि ड) भरत चव्हाणप्रभाग क्र. २१अ) संजय वाघुले, ब) प्रतिमा मढवी, क) मृणाल पेंडसे आणि ड) सुनेश जोशीप्रभाग क्र. २२अ) मिलिंद साळवी (रिपाइं), ब) नम्रता जयेंद्र कोळी, क) रूपाली साळवी आणि ड) विकास दाबाडेप्रभाग क्र. २३अ) मनोज साळवी, ब) दीपा गावंड, क) रंजना गाला आणि ड) अशोक भोईरप्रभाग क्र. २४अ) जयश्री सोनावणे (रिपाइं), ब) पुष्पा भोंडोकार, क) लक्ष्मीकांत यादव आणि ड) नरेश पवारप्रभाग क्र. २५अ) योगेश बोरसे, ब) साळवी यांची पत्नी, क) सारिका वरबडे आणि ड) रामविलास यादवप्रभाग क्र. २६अ) ऊर्मिला वाघमोडे, ब) दीपा सैनी, क) प्रशांत सूर्यवंशी आणि ड) मोहम्मद कासीमप्रभाग क्र. २७अ) आदेश भगत, ब) अर्चना पाटील, क) सीमा भगत आणि ड) सचिन भोईरप्रभाग क्र. २८अ) जयसिंग कांबळे (रिपाइं), ब) कल्पना पाटील, क) रेश्मा पवार आणि ड) रोहिदास मुंडेप्रभाग क्र. २९अ) ज्ञानेश्वर पाटील, ब) रिक्त, क) रिक्त आणि ड) रिक्तप्रभाग क्र. ३०अ) अमिना लियाकत शेख, ब) यास्मिन खान, क) जमिल चौगुले आणि ड) दिग्विजय सिंहप्रभाग क्र. ३१अ) वनिता बावीस्कर, ब) बालिका खैरे, क) दीपक पासी आणि ड) जगदीश मिश्राप्रभाग क्र. ३२अ) अमिना मोमिन, ब) रिक्त, क) इम्रान शिर्के आणि ड) रिक्त