ठाणे : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्र पक्ष म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसले तरी भविष्यात संधी मिळेल ही आशा असल्याची माहिती पीपल रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि आ. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. आघाडीच्या विजयात आणि पराभवात त्यांची साथ कधी सोडली नाही, याची आठवण कवाडे यांनी करुन दिली.कोरेगाव भिमाची घटना ही दंगल नसून दलित आणि बौद्धांवर हल्ला होता. त्याला सरकारची फूस होती, असा आरोप त्यांनी केला. आठवले यांना कोणती भूमिका घ्यायची असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारून घ्यावी लागते, असा टोला त्यांनीू लगावला.ठाण्यात एका खाजगी कार्यक्रमाकरिता कवाडे आले होते. मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नसले तरी सरकार बाबत आपण आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार आमचे सरकार असून समान किमान कार्यक्र माची अंमलबजावणी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे कवाडे यांनी सांगितले. सत्ता वाटपामध्ये महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये मित्रपक्ष म्हणून आमचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भाजपच्या काळात जे भयमुक्त वातावरण निर्माण झाले होते ते या सरकारच्या काळात दूर झाले असल्याचा दावा त्यांनी केला. नागरीकत्व कायदा हा देशाच्या हिताविरुद्ध कायदा कायदा आहे. हा देश सर्वसामन्यांचा देश असून देशाचे विभाजन करण्याचे काम आरएसएस करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मंत्रिमंडळात मित्रपक्षांना पदे न दिल्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
'भविष्यात सत्तावाटपात संधी दिली पाहिजे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:40 AM