शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदिवासींच्या जमिनी लाटल्या विरोधात मोर्चा; पोलिसांवरही आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:44 PM

सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गाव-पाड्यातील आदिवासी जमिनी लाटून बिगर आदिवासी समाजातील लोकांनी घरे बांधली आहेत.

पालघर : सफाळे पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गाव-पाड्यातील आदिवासी जमिनी लाटून बिगर आदिवासी समाजातील लोकांनी घरे बांधली आहेत. या कृत्या विरोधात अनेक निवेदने महसूल विभागाला देऊनही हा अन्याय दूर झालेला नाही. पोलिसांचे ही अत्याचार सुरूच असल्याच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेच्यावतीने सफाळे पोलीस स्टेशनवर सोमवारी मोर्चा काढला होता.सफाळे भागातील अनेक आदिवासी जमिनीवर बिगर आदिवासी लोकांनी कब्जा केला असून महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने ही अतिक्र मणे वाढीस लागल्याचा संघटनांचा आरोप आहे. या कार्यक्षेत्रात कार्यरत अनेक तलाठी, सर्कल हे भूमाफियांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत असून पैश्याची मागणी करीत आहेत. नुकतेच सफाळे येथील संखे या मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.सफाळे भागातील कपासे भागातील गट क्र मांक १२० मधील बबन व दशरथ खैराडी, गीता खरपडे, पार्वती पारधी, माणकू हाडळ, सर्व्हे नंबर ७३/अ मधील विनोद लोंढे, चेतन लोंढे, हेमंत लोंढे, सर्व्हे न.२२/१ व २२/४ मधील सतीश किरिकरे, सर्व्हेे न.३८ उंबर पाडा, नंदाडे येथील प्लॉट न.१/८ मधील कृष्णा वरठा, सर्व्हे न.३०४/१ मधील काशीनाथ पिलेना, गणेश पिलेना, सफाळे सरतोंडी येथील सर्व्हे न. १४३ मधील विकास व काशीनाथ शेलका, करवाळे गट न.२/अ मधील रामू व चंद्रकांत दळवी, सोनावे येथील गट न. ३०३ मधील दिनेश बरफ, विराथन खुर्द येथील गट न.६० मधील ललिता हाडळ आदी आदिवासी समाजातील लोकांच्या जमिनीवर जबरदस्तीने अतिक्र मणे करून घरे बांधण्यात आली असून काही जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांना करण्यात आल्या आहेत. या जमिनीचे पुरावे संबंधिता कडे असतानाही जमिनी तर मिळत नाही उलट पोलिसी खाक्या दाखवून दम दिला जात आल्याचे आरोप मोर्चा दरम्यान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष काळूराम धोदडे, दत्ता करबट, गजानन पागी, डॉ.सुनील पºहाड यांची भाषणे झाली.मोर्चेकºयांनी निवेदन दिलेले आहे. सदर प्रकार हा महसूल विभागांशी संबंधित आहे.आमच्याशी संबंधित प्रश्न असेल तर योग्य तो न्याय दिला जाईल. -संदीप सानप,सहा.पोलीस निरीक्षक, सफाळे

टॅग्स :palgharपालघर