डोंबिवली : केडीएमसीत समावेश असलेली २७ गावे वगळण्याचा आणि त्या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय सरकारदरबारी प्रलंबित असताना ही गावे महापालिकेतच राहावी, अशी तेथील नगरसेवकांची भूमिका आहे. मात्र, विरोध करणाºया नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. आजदे येथील जि.प. शाळेत पार पडलेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या सभेला स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी उपस्थिती लावल्याने त्यांचे गाव वगळण्याच्या भूमिकेला समर्थन असल्याचे उघड झाले आहे.२७ गावे महापालिकेत ठेवायची की वगळायची, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मंत्रालयात विशेष बैठक झाली. यात गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. २७ गावांमधील शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गावे वगळण्यास विरोध असल्याचे सह्यांचे निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने गावागावांत जाऊन चौकसभा घेण्यास सुरुवात केली आहे. आजदे येथील सभेला आमदार प्रमोद (राजू) पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, गंगाराम शेलार, चंद्रकांत पाटील यांच्यासह २७ गावांतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी आजदेचे भाजप नगरसेवक विनोद काळण यांनीही व्यासपीठावर उपस्थिती लावली होती. विरोध करणारे अन्य नगरसेवकही आपल्याकडे येतील, त्यामुळे त्यांना कोणी गद्दार बोलू नये, असे मत पाटील यांनी मांडले. काळण यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.।अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा२७ गावांमध्ये केडीएमसीचे अधिकारी त्रास देत असल्याने भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या अधिकाºयांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली. कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकाºयांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. पोलीस आयुक्तांना याबाबतचे पत्रही त्यांनी दिले आहे. केडीएमसीचे अधिकाºयांच्या त्रासामुळे व्यावसायिकही हतबल झाले आहेत.
विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये फूट, संघर्ष समितीची आजदेत चौकसभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 12:32 AM