शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

‘समृद्धी’च्या मोजणीला विरोध

By admin | Published: April 09, 2017 1:06 AM

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील

टिटवाळा/बिर्लागेट : मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपर्यंत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू नये, ही शेतकऱ्यांची मागणी फेटाळून लावत शुक्रवारी कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवलीत जमिनीच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले. प्रचंड प्रमाणात पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगलविरोधी पोलीस पथक तैनात करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत कडाडून विरोध केला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाला गेले महिनाभर विरोध सुरू आहे. बाधित होणाऱ्या दहा गावांपैकी तीन गावांत जमिनीची मोजणी होणार असल्याने गुरूवारी पोलिसांनी शेतकऱ्यांची बैठक फळेगावात घेतली. तेव्हा मुख्यमंत्री, शरद पवार, संघर्ष समितीच्या नेत्यांची बैठक होईपर्यंत मोजणी करू नये, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तरीही मोजणीचा निर्णय झाल्याने राये गावाजवळ फळेगांव, उशीद, दानबाव, उतणे, चिंचवली, निंबवली, गुरवली, रूंदेव नदगाव येथील शेकडो शेतकरी काळ््या फिती लावून जमले. नंतर प्रचंड पोलीस फौजफाट्यासह कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे आणि मोजणी करणाऱ्या दोन टीम आल्या. पोलिसांच्या एका तुकडीने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखून धरले, तर दुसऱ्या तुकडीने मोजणी करणाऱ्यांना संरक्षण पुरवले. त्यानंतरही घोषणा सुरूच राहिल्याने राज्य राखीव पोलीस दल, दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आल्याने शेतकरी भडकले. (वार्ताहर)समृद्धी महामार्गामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील १०७ हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. मोजणीनंतरच कुणाची किती जमीन जाईल, ते समजेल. त्यात कोणतीही जबरदस्ती करण्यात येत नाही. सध्या राया, निंबवली व गुरवलीत मोजणी झाली आहे.- किरण सुरवसे, तहसीलदार ,कल्याण ही सरकारची हुकूमशाही व जबरदस्ती आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही राज्यातून शेतकऱ्यांना एकत्र करू.- विश्वनाथ पाटील, कुणबी सेनाप्रमुख शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही पोलिसी बळाचा वापर करून हा सर्व्हे केल्याने भविष्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. - चंद्रकांत भोईर, समन्वयक, संघर्ष समिती, कल्याण मोजणी शांततेत सुरू होती. शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी स्वत:हून जेलभरो आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. - प्रशांत कदम, अप्पर पोलीस अधीक्षक