ठाणे: गांवपाड्यामधील अत्यावश्यक सेवेच्या विकास कामांसाठी आयत्यावेळी खर्च करावा लागणारा सेस निधी जिल्हा परिषदेच्या कार्यालयांच्या भाड्यापोटी पूर्ण खर्च होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा निधी वाचवण्यासाठी केवळ गरजू विभाग भाड्याच्या इमारतीत हलवण्यात यावे. उर्ववरित विभाग जिथे आहे, तेथेच ठेवावे, त्यामुळे होणार खर्च बचत होईल, यासाठी माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत यांनी प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत.
येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी येथीला बाजारपेठेतील बहुतांशी कार्यालये अन्य ठिकाणी भाड्याच्या इमारतीत हलवण्याचे निश्चित झाले आहे. पण अन्य ठिकाणी असलेले कार्यालयेही एकत्रीकरणाच्या नावाखााली भाड्याच्या इमारतीत हवण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमधील कृषी विभागासह, पशू संवर्धन, लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, तांत्रिक विभाग, स्वच्छ भारत मिशनचे कार्यालय आदी विभाग भाड्याच्या इमारतीत न हलवता तेथेच ठेवण्याची मागणी घरत करीत आहे. या कार्यालयांच्या भाड्यापोटी जाणारी रक्कम जिल्हा परिषदेला वाचवता येईल. त्यामुळे सेसचा निधी बचत होईल आणि त्यातून ऐनवेळी अत्यावश्यक विकास कामे हाती घेता यईल. त्याचा फायदा ग्रामस्थाना होईल, हा सेस निधी ग्रामस्थांच्या हक्कचा आहे. तो त्यावरच खर्च झाला पाहिजे. त्याचे संकलन आधीच तुटपुंज्ये आहे. त्यातूनही दरमहा भाउे, डिपॉजिट आदी रक्कम खर्च करून जिल्हा परिषद ग्रामीण जनतेच्या निधीवर डल्ला मारीत असल्याचे घरत यांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे हा सेसचा निधी खर्च करण्यावरून वाद वाढण्यचे चिन्हे दिसून येत आहे. त्यावर अता जिल्हा परिषद काय भूमिका घेणार, त्याकउे सर्वांचे लक्ष लागून आहे.