ठाणे: कार्ला (लोणावळा ) येथील लाखो भाविकांची कुलदैवत असलेल्या श्री एकवीरा देवीच्या मंदिरात दानपेटीवर मंदिरातील गुरव (पुजारी) यांच्याकडून ताट ठेवून देवस्थानाच्या उत्पन्नात भागिदारी केली जात होती. यापुढे हे ताट कायमचे बंद करण्याचे आदेश पुण्याचे धर्मदाय आयुक्त देशमुख यांनी दिल्याची माहिती एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी बुधवारी दिली.श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टला मुळातच अत्यल्प उत्पन्न आहे. त्यातही देवीच्या दानपेटीतील ७५ टक्के हे मंदिरातील गुरव (पुजारी) यांना मिळते. त्यातील २५ टक्के रक्कम ही देवस्थान ट्रस्टला भाविकांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी उपलब्ध होते. देवस्थानच्या वाटयाला येणाºया २५ टक्के रकमेवरही गुरव मंडळींकडून ताट ठेवून वाटा घेतला जात होता. घटनेच्या विरोधात ठेवून पेटीवर हे ताट ठेवण्यात येत होते. त्यामुळेच अपुºया निधीतून राज्यभरातून येणा-या भाविकांसाठी सोयी सुविधा पुरविणे देवस्थानसाठी आव्हान निर्माण होत होते. तरीही उपलब्ध निधीतून देवस्थान ट्रस्टच्या वतीने गडावर भाविकांसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून दानपेटीवर ताट ठेवण्याची पद्धत वारंवार सूचना करुनही बंद केली जात नसल्यामुळे ट्रस्टचे अध्यक्ष तरे आणि उपाध्यक्ष मदन भोई तसेच पदाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचिकेच्या सुनावणीवर ट्रस्टच्या कारभारासाठी त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली. याच समितीच्या अहवालानुसार पुण्यचे धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी दानपेटीवरील ताट बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतू चार महिने उलटूनही त्यावर अंमलबजावणी न झाल्याने अखेर कायमस्वरुपी हे ताट बंद करण्याचे लेखी आदेश गुरवांना देण्ेयात आले आहेत. या निर्णयाचे स्वागत श्री एकवीरा देवीच्या भाविकांनीही केले असून आता पेटीवरचे ताट बंद झाल्याचे तरे यांनी सांगितले.
श्री एकवीरा देवीच्या मंदिरात दानपेटीवर ठेवले जाणारे ताट बंद करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 10:20 PM
श्री एकवीरा देवीच्या मंदिरात गुरवांकडून दानपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा ऐतिहासिक आदेश पुण्याचे धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी दिल्याची माहिती कार्ला येथील श्री एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी बुधवारी ठाण्यात दिली.
ठळक मुद्देदेवस्थानचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी दिली माहितीपुण्याचे धर्मादाय आयुक्त देशमुख यांचे आदेशदेवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांनी व्यक्त केले समाधान