- जितेंद्र कालेकर
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी १८ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी काढले आहेत. अंबरनाथच्या नरेंद्र पाटील यांच्यासह सहा अधिकाºयांना वरिष्ठ निरीक्षकपदाची संधी मिळाली आहे. विशेष शाखेसारख्या साइड ब्रँचमधून सहा अधिकाºयांनाही पोलीस ठाण्यात कार्यकारीपदावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या. कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांची वाहतूक नियंत्रण शाखेत बदली झाल्याने त्यांच्या जागी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे किशोर खैरनार यांची बदली झाली आहे. याशिवाय, ठाणे शहर नियंत्रण कक्षातील सुभाष ढवळे यांची शांतीनगर आणि विजय पोवार यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. डायघर पोलीस ठाण्यातून पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण कक्षात आलेल्या सुशील जावळे यांना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संधी मिळाली. भिवंडी शहरचे दादाहरी चोरे यांना मानपाडा, अंबरनाथचे नरेंद्र पाटील यांना खडकपाडा, विशेष शाखेचे मालोजी शिंदे यांना नारपोली (सुरेश जाधव यांच्या जागी), ठाणे शहर नियंत्रण कक्षातील विजय शिंदे यांना श्रीनगर (सुलभा पाटील यांच्या जागी), शांतीनगरचे राजेंद्र मायने यांना हिललाइन आणि वाहतूक शाखेचे रमेश भोये यांना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बढतीवर कार्यकारीपदावर संधी देण्यात आली आहे.
प्रिझन एस्कॉर्टचे दीपक देशमुख यांची बदलापूर पोलीस ठाण्यात, आर्थिक गुन्हे शाखेचे अभय धुरी यांची टिळकनगर आणि विशेष शाखेचे जितेंद्र आगरकर यांचीही कोपरी पोलीस ठाण्यात (कविता गायकवाड यांच्या जागी) कार्यकारीपदावर वरिष्ठ निरीक्षकपदी बदली झाली आहे.तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांच्या बदल्यापोलीस निरीक्षकांना एकाच पोलीस ठाण्यात अथवा लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तीनपेक्षा जास्त वर्षांचा कालावधी उलटला असेल, अशा सर्व अधिकाºयांचा या बदल्यांमध्ये समावेश केला आहे.विशेष शाखेचे अजय कांबळे- भिवंडी शहर, वाहतूक नियंत्रण शाखेचे रमेश भोये- विठ्ठलवाडी, वाहतूक शाखेचे संभाजी जाधव- महात्मा फुले चौक आणि हेमलता शेरेकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.