लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सोमवारी काढले आहेत. यात चार अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेमध्ये संधी देण्यात आली आहे.ठाणे आयुक्तालयातील आस्थापना मंडळाने विहित कालावधी पूर्ण केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात उल्हासनगरच्या सुवर्णा हासे यांची बदलापूर पश्चिमेत, अनुपमा खरे यांची विशेष शाखेत, निता मांडवे यांची गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये, महेंद्र चौधरी यांची निजामपूरा तर सचिन तडाखे यांची विशेष शाखेत बदल केली आहे. शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या कृपाली बोरसे यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात तर प्रदीप सरफरे यांना गुन्हे शाखेत संधी मिळाली आहे. वाहतूक शाखेचे सुधीर कदम यांची ठाणेनगर तर सुधर्म सावंत यांची मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नौपाडयाच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे निलेश मोरे यांनाही गुन्हे अन्वेषण विभागात तर ठाणेनगरचे अजित गोंधळी यांना आर्थिक गुन्हे शाखेत बदली मिळाली आहे. मानपाडयाच्या मनिषा जोशी यांची कोळसेवाडी तर दिनेश सोनवणे यांची ठाणेनगरमध्ये बदली झाली आहे. कासारवडवलीच्या शीतल चौगुले यांची विशेष शाखेत, ठाणेनगरचे योगेश पगारे यांची वाहतूक शाखेत, निजामपुराचे अमोल दाभाडे -बदलापूर पूर्व, खडकपाडयाचे धर्मेद्र आवारे- भिवंडी शहर, टिळकनगरचे विनोद कडलग- कोनगाव, विठ्लवाडीच्या अतुल सोनावणे आणि भोईवाडयाच्या तुकाराम जोशी यांची वाहतूक शाखेत, हिललाईनच्या विनोद पाटील यांची मुंब्रा तर बदलापूर पश्चिम येथील नितीन चौगुले यांची विशेष शाखेत बदली केली आहे.* याशिवाय, वर्तकनगरचे अब्दुल जावेद शाह यांची शिवाजीनगर, श्रीनगरचे दिगंबर कोपरे यांची बदलापूर, चितळसरचे तानाजी रोडे यांची मुख्यालयात, वागळे इस्टेटचे अरविंद वळवी यांची कोळसेवाडी तर कोळसेवाडीच्या अनिल भिसे यांची मानपाडा पोलीस ठाण्यात बदली केली आहे. बाजारपेठचे नंदकुमार केंजळे कल्याण नियंत्रण कक्षात, बाजारपेठचे प्रमोद सानप यांची भिवंडी शहरमध्ये, शिवाजीनगरचे जयेंद्रकुमार भोयर यांची वागळे इस्टेट आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे निलेश करे यांची राबोडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
ठाण्यातील ३२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:46 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सोमवारी काढले आहेत. यात चार अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेमध्ये संधी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देउल्हासनगरच्या पाच एपीआयचा समावेशपाच अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत संधी