शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रिकामी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 12:23 AM

‘महा’चा संभाव्य तडाखा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ठाणे : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाºयालगत असलेले हॉटेल, रिसॉर्ट खाली करण्यात यावेत. तसेच, या हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत घेऊ नये, अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. ‘महा’चक्र ीवादळाच्या वाढत्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. चक्रीवादळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि उपाययोजना, पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियोजित सुट्या रद्द केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची पूर्वतयारी सुरू केली असून, संबंधित सर्वच कार्यालयांच्या प्रमुखांना लेखी सूचना पाठविल्या आहेत. संबंधित परिसरातील नोडल अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच अधिकारी यांची सर्व माहिती सादर करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावे. विभागाला देण्यात आलेल्या आपत्कालीन यंत्रसामग्री लाइफ जॅकेट, लाइफ बायझ, रिंग्स, रबरी होड्या यांच्या तपासण्या करून त्या जय्यत तयारीत ठेवाव्या तसेच यांत्रिक बोटी, छोट्या होड्या या खाजगी असलेल्या उपलब्ध कराव्यात. सध्या उपलब्ध असलेल्या बोटींची तपासणी करणे अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, ग्रामपंचायतीच्या सर्वच कर्मचाºयांना चक्र ीवादळाबाबत दवंडी देऊन जनजागृती करणे, नागरिकांची माहिती देऊन मानसिकता वाढविणे याची दखल घेण्याचे आदेश लेखी जारी करण्यात आलेले आहेत. समुद्री किनाºयालगतच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांनी यंत्रसामग्रीची संख्या मोजमाप करावी. त्याचप्रमाणे किनाºयालगतच्या ग्रामपंचायत समितीने गावात किती लोक राहतात, याची आकडेवारी ठेवावी. चक्रीवादळाबाबत जिल्हा प्रशासनाने लेखी सूचना सर्व पालिका, नगरपालिका यांच्यासह सर्वच ग्रामपंचायती आणि किनाºयालगतच्या ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.सरकारीसह खासगी दवाखाने सतर्क असावेतकदाचित जर चक्रीवादळाच्या परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करावयाचे असल्यास त्यांची निवारा, खाणेपिणे आणि औषधे यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्यकेंद्राने आपल्या रु ग्णालयात औषधांचा पुरवठा ठेवावा. सर्व सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये प्रथमोपचार गट आणि आवश्यकतेनुसार रु ग्णवाहिका आणि इतर सुविधा तैनात ठेवाव्यात.शाळा-महाविद्यालये बद ठेवावीतसंभावित चक्रीवादळाच्या कालावधीत शिक्षण अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार शाळा, कॉलेज बंद ठेवावीत आणि विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे. सरकारी आणि निमसरकारी अशा सर्वच कार्यालयांच्या प्रमुखांना जिल्हा प्रशासनाने सूचना आणि संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक त्या सूचना केलेल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.तटरक्षक दलाने घ्यावयाची काळजी : तटरक्षक दलाला केलेल्या सूचनांत समुद्रात कामानिमित्त किंवा मच्छीमारीसाठी गेलेल्या सर्व बोटींना परतीच्या प्रवासाच्या सूचना द्याव्यात, गरजेनुसार सर्व बोटींना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटींना सुरक्षित किनाºयावर आणावे, तटरक्षक दलाने डायव्हर्स टीम तैनात ठेवावी, त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देण्यात यावी.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका