ठाणे : ठाण्यासह अन्य काही महापालिकांमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून नागरिकांचेही हाल होत आहेत. याबाबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे.अनलॉक २ सुरू झाल्यानंतरही ठाणे, पुणे आणि इतर काही महापालिकांनी आपापल्या शहरात कडक लॉकडाऊन घेण्याचा आणि आता तो वाढवण्याचाही निर्णय घेतलेला आहे. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत, तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. सरकार एकीकडे बिगिन अगेन म्हणत असताना ठाण्यात घेतलेल्या लॉकडाऊनमध्ये कसे बिगिन अगेन होणार, यावरुन दुकानदार, व्यापारी, लघुउद्योजक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.अनेकांना नोकºया गमवाव्या लागल्या असून त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या अशा धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे हाल आणि व्यापाºयांचे नुकसान होत असून याबाबत केंद्राने अहवाल मागवून कारवाई करण्याची मागणीही सहस्रबुद्धे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात सहा फॉर्म्युल्यावर काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क न लावल्यास कारवाई करणे, घराबाहेर पडणाºयांना हॅण्ड सॅनिटायझर अनिवार्य करणे, सार्वजनिक आणि खासगी वाहनांमधील प्रवासासाठी नियम निश्चित करणे असे फॉर्म्युले सुचवले आहेत.
सामान्य नागरिक आला मेटाकुटीला; विनय सहस्रबुद्धे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 11:59 PM