शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
2
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
6
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
7
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
8
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
9
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
10
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
12
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
13
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
14
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
16
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
17
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
18
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
19
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
20
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

भांडवलशाही व्यवस्थेविरोधात संघटन आवश्यक, प्रा.डॉ. वंदना सोनाळकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 6:31 AM

शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.लोकवाङ्मयगृह व ठाणे मतदाता जागरण अभियानतर्फे शनिवारी शिरीष मेढी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ‘जागतिक अर्थकारण, पर्यावरण व भारत’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी संजीव चांदोरकर यांच्या ‘अर्थाच्या दाहीदिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉ. एम.ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सोनाळकर म्हणाल्या की, पूर्वी विषमतेची चर्चा होत होती, पण आज विषमता वाढूनही त्याची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही. सरकार स्वत:ला कल्याणकारी म्हणवत असतानाही, विविध योजनांवर खर्च कमी करत आणले जात आहेत. भांडवलशाहीच्या अतिरेकामुळे विषमता वाढीस लागणार, हे सर्वांना माहीत होते, तरीही त्याचाच पुरस्कार जगभर होतो आहे. या विषमतावादी स्थितीचे दोन जग निर्माण झाले आहेत. यात मानवतावादी विचारही मागे पडत आहेत. मूल्य बदलली जात आहेत. नवीन बेदरकार संस्कृती निर्माण होत आहे.पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे म्हणाले, निसर्गातील कार्बन सायकल सुदृढ राहिली तरच पर्यावरण वाचेल. अन्यथा, पृथ्वीचे अस्तित्व संपुष्टात येईल. वातावरण बदलामुळे आदिवासी समूहांचे कुपोषण वाढले आहे. विकास व पर्यावरण ही दोन चाके आहेत. यात सध्या विकासाचे एकच चाक मोठे करण्याचा कार्यक्र म सुरू आहे. यामुळे हा रथ कोसळणार आहे. शहर विकास करताना गाड्या वाढतात व वनसंपत्ती नष्ट होते; पण यावर कोणी विचार करत नाही. शेती व शेतकरी यांचे आयुष्य पर्यावरण नाशामुळे संकटात आले आहे.सध्या जगभर विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. ती आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काय बदल घडतात, याचा अभ्यास कोण करतेय का? यात मूल्येही बदलत आहेत, हेही लक्षात घ्यावे, असे डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले. या वेळी मेढी व चांदोरकर यांनीही मते व्यक्त केली.

टॅग्स :Politicsराजकारण