ठाणे : सुदृढ आणि स्वस्थ बाळांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे जॉन्सन हेल्दी बेबी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक सभागृह, बी केबिन, ठाणे (प.) येथे सुरू होणार असून नावनोंदणी सकाळी १० वाजेपासून करता येईल. बाळाचे आरोग्य आणि पालनपोषणासंदर्भात जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हे शिबिर व स्पर्धा घेण्यात येणार आहे. गुटगुटीत बाळाच्या चेहऱ्यावरच्या हास्यापेक्षा आईवडिलांना आणखी मौल्यवान काय असू शकते? परंतु, त्या नाजूक जीवाची काळजी घेणे, हे फार मेहनतीचे काम असते. त्याचे मार्गदर्शन या वेळी होईल.जॉन्सनला डॉक्टरांचीही पसंतीलहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल एका शतकापासून जॉन्सन बेबीची विविध उत्पादने मातांची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पहिली पसंती आहे. वैद्यकीय परीक्षणातून सिद्ध झालेली ही सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सुखावह वाटतील, अशीच तयार केली जातात. लहान बाळांचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांक डे विशेष लक्ष देऊन सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशी तिहेरी लाभयुक्त (जॉन्सन ट्रिपल बेबी प्रॉडक्शन) उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत. या स्पर्धेसाठी ०-१ वर्ष, १-३ वर्षे, ३-५ वर्षे असे तीन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. शिवाय, प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी बाळाचा जन्मदाखला, वयाचा पुरावा, वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६५२२००२२६/ ९८७०९१२२३३
जॉन्सन प्रस्तुत सुदृढ बालक स्पर्धेचे रविवारी आयोजन
By admin | Published: July 30, 2015 11:23 PM