ठाणे : सूरसुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित कराओके गायन स्पर्धा `मेरी आवाज मेरी पहचान-2019' तीन दिवस संपन्न झाली. ऑडिशन राऊंडमध्ये 300 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा 5 गटांत विभागली होती. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह सभागृहात या स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ सोहळा संपन्न झाला.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत 84 जणांनी सहभाग घेऊन गाणी सादर केली. 5 गटांतून 37 गायकांनी बक्षीस पटकावली. अभिमानाची बाब म्हणजे धिरज गिरी नावाचा 34 वर्षे वयाचा स्पर्धक जो दृष्टिहीन आहे व तो लोकल ट्रेन मध्ये किरकोळ वस्तू विक्री करतो आणि त्या कमाईतून त्याने गायनात विशारद प्राप्ती केली अशा स्पर्धकाने यात द्वितीय क्रमांक पटकावला अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी व सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल मॅनेजमेंट इव्हेंट युनिटचे अध्यक्ष विरेंद्र शंकर हे उपस्थित होते. त्यांनी यातील विजेत्यांपैकी एक-दोनजणांना इव्हेंटमध्ये संधी देणार असल्याचे यावेळी सांगितले. आनंद मेनन, त्रिपती सोनकार आणि प्रशांत काळुंद्रेकर यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. सूरसुदान शौर्या स्वर प्रस्तुत मेरी आवाज मेरी पहचान स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -
गट-अ (वयोगट 8 ते 15 वर्षे) - प्रथम - अनन्या कुमार, द्वितीय - आर्या क्षीरसागर, तृतीय - अवनी कुमार आणि उतेजनार्थ - वेदांत फसे व संस्कृति जगदाळे
गट `ब' (वयोगट 16 ते 30 वर्षे) - प्रथम - प्रबुद्ध जाधव, द्वितीय - नंदिनी परिपाक, उत्तेजनार्थ - रेणुका राजदेरकर आणि रोहित मेहता
गट `क'- (वयोगट 31 ते 45 वर्षे) - पुरुष - प्रथम - मोहन मुसळे, द्वितीय - धीरज गिरी, तृतीय - शाशी नायर आणि उत्तेजनार्थ- - ओमकार धोत्रे व धनंजय स्वामी
महिला गट - प्रथम - विजया प्रधान, द्वितीय - शर्मिष्ठा बासू, तृतीय - गौरी काणे, उत्तेजनार्थ - श्रद्धा म्हात्रे व मीरा शर्मा
गट `ड' - (वयोगट 4 ते 60 वर्षे) - पुरुष - प्रथम - व्यंकटेश कुलकर्णी, द्वितीय - नंदन जोशी, तृतीय - आशिष लुथिया, उत्तेजनार्थ प्रसाद गद्रे व पंकज जोशी
महिला - प्रथम - पल्लवी जयवंत, द्वितीय - भारती दगरा, तृतीय - निशा पंचाल
गट `इ' (वयोगट 61 वर्षे पुढील)- पुरुष, प्रथम - शरद इंगळे, द्वितीय - सुहास कुलकर्णी, तृतीय - प्रबोध चौबे, उत्तेजनार्थ - राघवेंद्र ओडियार आणि मोरेश्वर ब्रामहें.
महिला - प्रथम - सुरेख जोशी, द्वितीय - सुखदा ठाकूर आणि तृतीय क्रमांक - शीतल गडकरी.