पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालया तर्फे, उच्च न्यायालय मुंबई येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील प्रत्यक्ष प्रकरणाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी विधी महाविद्यालयाचा प्रथमवर्ष-व्दितीय वर्षाचा विद्यार्थ्यानसाठी विधी महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांचा पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालय येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२० विद्यातर्थासह महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अॅड. दिशा तिवारी, अॅड. उत्कर्षा जुन्नरकर, अॅड. राधा मल्होत्रा यांनी मुबंई उच्च न्यायालयाला भेट दिली.न्यायालयाची स्थापना १८६२ साली झाली. त्या काळी इंग्रजांनी बांधलेली भव्य न्यायालयाची वास्तू तीची रचना आणि इंग्रजाचा काळी न्यायालयाची कामकाज पध्दती आजची पध्दती यांची सविस्तर माहिती मिळाली. कामकाज पध्दती, उच्च न्यायालयाची व्यवस्थापनाची उत्कृष्ट पध्दतीचा असा प्रत्यक्ष अनुभव प्रथमच विद्यार्थाना मिळाला. तसेच न्यायालयातील विविध समृध्द ग्रंथालालयातील पुस्तक मांडणी पाहता आली. जनतेचा हितासाठी न्यायदान करणाऱ्या उच्च न्यायलयाचा कामकाज पध्दतीचा अनुभव प्रत्यक्ष क्षेत्रभेटीव्दारे विद्यार्थाना प्राप्त झाला.१८६० पासून ची सर्व कागदपत्रे ऑल इंडिया रिपोर्ट, प्रिव्हि कॅन्सिल रिपोर्ट, आॅल इंग्लड रिपोर्ट यासारखी कागदपत्रे पाहण्याची संधी मिळाली तसेच ऐतिहासिक आठवणीनी उजाळा मिळाला. ह्या क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला व अशा विविध क्षेत्रभेटीचे आयोजन केले जावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी उच्च न्यालयाचे वास्तूसंग्रहालय, कोर्टापूढे चालु असणारे प्रकरण यांचा प्रत्यक्ष अनुभव या वेळी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांना घेता आला.
उच्च न्यायालय मुंबई येथे क्षेत्रभेटीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:08 PM