शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

अन्यथा रस्त्यावर उतरू, गडसंवर्धन करणाऱ्यांचा सरकारला इशारा; राज ठाकरेंची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:18 AM

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या डोंबिवली दौºयावर आले होते.

डोंबिवली : ‘गडकिल्ले भाड्याने दिल्यास माझ्याशी गाठ आहे’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असताना रविवारी गडसंवर्धन करणाºया ११ संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची डोंबिवलीत भेट घेतली. गडकिल्ले वाचविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आले. गडकिल्ल्यांसंदर्भात घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही संघटनांकडून यावेळी सरकारला देण्यात आला. व्यसनमुक्त शिवकिल्ले कायदा व्हावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या डोंबिवली दौºयावर आले होते. शनिवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना गडकिल्ले भाड्याने देण्याच्या सरकारच्या धोरणावर टीका करताना मंत्र्यांनी त्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशीही सूचना केली. दरम्यान, रविवारी गडसंवर्धन करणाºया ११ संघटनांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ठाकरे यांनी संबंधित विषयात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावर गडकिल्ले संवर्धनाचे आश्वासन ठाकरे यांनी त्यांना दिले.

या संघटनांच्या माध्यमातून गेली १० वर्षे व्यसनमुक्त आणि प्लास्टिकमुक्त गडकिल्ले अभियान सुरू आहे. चित्र, व्यंगचित्र, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून पाच वर्षांपूर्वी व्यसनमुक्त शिवकिल्ले कायद्याचा मसुदा बनवून हा कायदा व्हावा म्हणून १५० हून अधिक आमदारांना तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील ३०० किल्ले हेरिटेज हॉटेलसाठी देऊ केल्याकडेही ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. आम्ही सर्वच याचा विरोध करीत असून आपण याचे नेतृत्व करावे, अशी विनंती संबंधित संघटनांकडून करण्यात आली. याला ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे कल्याण शहराध्यक्ष निर्मल निगडे यांनी दिली.

मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकशनिवारपासून डोंबिवलीच्या दौºयावर आलेल्या राज यांनी रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी कल्याणचे पदाधिकारीही उपस्थित होते. राज यांनी उपस्थितांबरोबर राज्य आणि केंद्रातील चालू घडामोडींवर चर्चा केली. तसेच कोणाची काही तक्रार आहे का, काही बोलायचे आहे का, अशीही विचारणा केल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीबाबत मनसेची भूमिका योग्य वेळी जाहीर करू, असे राज यांनी स्पष्ट केल्याने रविवारच्या बैठकीत निवडणुकीवर कोणतेही भाष्य त्यांनी केले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. माध्यमांना या बैठकीत प्रवेश नव्हता.

दुपारी अडीचला मुंबईला रवानारविवारी सकाळी ११.३० ला बैठक आटोपल्यावर राज हे त्यांचे पांडुरंगवाडीमधील मित्र सुशील आगरकर यांच्या निवासस्थानी पूजेच्या निमित्ताने गेले होते. तेथून दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईला रवाना झाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे