ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढून देखील सातत्याने बारामती लोकसभे मध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करण्याचे काम विजय शिवतरे करीत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री शिंदे यांचा आपल्या नेत्यांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.शिवसेनेचे विजय शिवतरे यांच्याकडून वारंवार महायुतीचा धर्म तोडण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्यानतंरही त्यांच्याकडून वारंवार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल असे कृत्य करायचे नसल्याचेही परांजपे यांनी सांगितले. शिवतरे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्टÑात मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणने त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात असून ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शिवतरे हे महायुतीच्या दुधात मीठ टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ ला दाखविली असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी पाळत आहे. परंतु शिवसेनेकडून राष्टÑवादीचे शक्तीस्थळ राष्टÑवादीचा स्वाभिमान बारामती मध्ये महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे.संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मत्री पद का मिळाले नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांत अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील असा सल्लाही त्यांनी दिला.कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाºयांनी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदार संघाची मागणी केली आहे. यावर परांजपे यांनी भाष्य केले आहे. मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभ रहावे त्याची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार भाजपचे आहेत, भाजपच्या लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शहा बरोबर राज ठाकरे यांची काय राजनीतिक चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले.
...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा
By अजित मांडके | Published: March 20, 2024 2:51 PM