शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

दुष्काळमुक्तीसाठी आमचाही खारीचा वाटा, ठाणे जिल्ह्यातील तरुणांचे श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:04 AM

राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - राज्यावरील दुष्काळाचे सावट केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून दूर होणार नाही. तर, त्याला समाजाची साथ लाभल्यास लोकचळवळीच्या माध्यमातून या संकटावर मात करता येऊ शकते. त्याच उद्देशाने पाणी फाउंडेशनचे महाराष्टÑात काम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी ‘आर्यन ग्रुप’ या नावाने महाराष्टÑ दिनी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील खांडवी गावात श्रमदान करून ओढ्यामध्ये दोन बंधारे बांधून दुष्काळमुक्तीसाठी खारीचा वाटा उचलला. नोकरी सांभाळून हे तरुण ही सामाजिक बांधीलकी जपत आहेत.महाराष्टÑाची अनेक गावे दरवर्षीच दुष्काळाचे चटके सोसत आहेत. पाण्यावाचून होणारी त्यांची होरपळ दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशनने लोकचळवळ उभी केली. तीन वर्षांपासून हा तरुणांचा गु्रप ‘आॅक्सिजन + पाणी’ हा उपक्रम राबवत आहे. काही गावांत त्यांना ग्रामस्थांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याचा अनुभवही आला. मात्र, तरीही त्या-त्या गावातील तरुणांना घेऊ न ते हे काम करत आहेत.या वर्षी या ग्रुपने खांडवी गावाची निवड केली. त्यासाठी ३० एप्रिलला ही तरुण मंडळी लातूर एक्स्प्रेसने सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील या गावात पोहचली. १ मे रोजी खांडवी गावात चहा-नास्ता करून ६.३० वाजता गावातील नियोजित जलसंधारण कामाकडे ही टीम वळली. तीन तास श्रमदान करून गावातील ओढ्यात या ग्रुपने दोन बंधारे बांधण्यास मदत केली. या कामात गावातील महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. दैनंदिन कामाशी सांगड घालणारी गाणी गात त्या जलसंधारणाचे काम करत होत्या. त्यामुळे इतरांनाही कामाचा हुरूप येत होता. श्रमदानाच्या ठिकाणी नाश्ता झाल्यानंतर आर्यन ग्रुप या कामाला शुभेच्छा देत पुढच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर या ग्रुपने गोडसेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील मुलांनी गाणी व नृत्य सादर करून मनोरंजन केले. या मुलांना दप्तराचे वाटप, तसेच शाळेला क्रीडा साहित्य, प्रथमोपचार पेटी आणि चांगल्या सवयींचा तक्ता देण्यात आला.नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकीकल्याण, डोेंबिवली, बदलापूर येथील तरुणांनी एकत्र येऊन आर्यन गु्रप तयार केला आहे. चार ते पाच सदस्यांसह सुरुवात झालेल्या ग्रुपच्या सदस्यांची संख्या ३० वर पोहचली आहे. अनेक सदस्य हे नोकरी करतात. त्यामुळे सुटीचा प्रश्न असल्याने त्यांना पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात फार योगदान देता येत नाही. त्यामुळे १ मे रोजी आम्ही त्यात सहभागी होतो आणि गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी खारीचा वाटा उचलत असल्याचे ग्रुपचे सदस्य गेणू कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीsocial workerसमाजसेवक