शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आपला दवाखाना ही काळाची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:44 AM

ठाण्यातील गोरगरीब रहिवाशांच्या आरोग्यासाठी महापालिकेने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. दिल्लीत आप सरकारच्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर महानगरपालिकेने ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यात महापालिकेची आरोग्य केंद्रे अगोदरच कार्यरत आहेत.

- अजित मांडकेदिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ठाण्यातही आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. विरोधकांनी मात्र या संकल्पनेवर केल्या जाणाऱ्या सुमारे १६0 कोटींच्या खर्चावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेची आरोग्य केंद्रे अगोदरच कार्यरत असताना आणि लोकसंख्येच्या तुलनेत ५० केंद्रांची गरज नसताना केवळ पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आणि ठाणेकरांना चांगली सुविधा देण्याच्या नावाखाली हा आणखी एक भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. परंतु, शहराची वाढती लोकसंख्या, शासकीय रुग्णालयांवर वाढत असलेला ताण आणि गोरगरीब रुग्णांना आपल्या घराजवळच कोणताही खर्च न करता मोफत उपचार मिळत असल्याने ही संकल्पना योग्य असून देशाने, राज्याने ही संकल्पना मान्य केली आहे. ही काळाची गरज असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असून त्यामुळेच ही संकल्पना राबवली जात असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.यापूर्वी दिल्लीत आप पक्षाने मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबवली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेने शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला किसननगर आणि महात्मा फुलेनगर भागात ही संकल्पना राबवली गेली. या दोन्ही केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ही संकल्पना शहरभर राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या उपक्रमावर पुढील पाच वर्षांसाठी पालिका १६० कोटींचा खर्च करणार आहे. या खर्चावर विरोधी बाकावरील राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. शहराच्या विविध भागांत एकूण ५० आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबवण्यास शुक्रवारी महासभेत विरोधकांचा विरोध डावलून मंजुरीही दिली.दरम्यान, आरोग्य केंदे्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या आरोग्य केंद्रांचा वापर करणारी लोकसंख्या पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंद्रे सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटीरुपयांची उधळपट्टीच केली जाणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले आहे. ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रांवर एकही रुग्ण फिरकत नाही. तरीही, आणखी ५० ठिकाणी ही योजना राबवण्याचा घाट घातला जात असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘आपला दवाखाना’मुळे ठाणे महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी रुपये असे सुमारे १५९.६० कोटी रुपये मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत. हा ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.सायंकाळीही मिळणार आरोग्य सुविधादिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात महापालिकेने ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यातील जवळपास निम्मी लोकसंख्या झोपडपट्टी आणि चाळीत वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची २७ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील आरोग्य सुविधांवर ताण येत असून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होताना दिसत नाहीत.सकाळच्या वेळेतच लोकांना आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होतात. परंतु, सायंकाळच्या वेळेत मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत आपला दवाखाना ही संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.आपला दवाखानाच्या माध्यमातून ही सेवा सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० यावेळेत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिवाय, या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाºया रुग्णाला १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. दरम्यान, या उपक्रमाचा पहिला पायलेट प्रोजेक्ट शिवाजीनगर आणि खारेगाव या भागांत राबवण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचेही केंद्रे यांनी स्पष्ट केले.या संकल्पनेत दवाखाना उभारणीचा खर्च, त्याठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे, हा खर्च संबंधित संस्थाच करणार आहे. एक ‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल, तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रु पये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे.या दवाखान्यात येणाºया रुग्णांची वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी आणि वेळेत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे ही संकल्पना योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणे