ठाणे : दैनंदिन आयुष्य जगताना सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कळत नकळत का होईना आपला राजकारणाशी संबंध येतो. आमचा नेता लय पॉवरफुल या नाटकाच्या माध्यमातुन सध्याची बदललेली राजकीय समीकरणे व लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण मांडण्यात आला आहे. ४३० क्रमांकाचा अभिनय कट्टा खऱ्या अर्थाने आठवणीत राहणारा कट्टा ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी दिली.
मूळ गोष्टीकडे पाठ फिरवत नेहमी नको त्या गोष्टींकडे लोकांच मन विचलित करण्याचे काम राज्यकर्ते करत असतात.यावर नाटकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ह्या नाटकाच लेखन अरहत धिवरे यांनी केलं होत आहे तसेच दिग्दर्शक संदीप लबडे यांनी केल होत . प्रकाशयोजना -आकाश शिर्के ,संगीत -ओंकार करंगुटकर ,नेपथ्य -गौरव खोसे ,नृत्य -नंदिनी चिकणे ,सूत्रधार -विलास दाते . निर्मिती प्रमुख -शेखर सतीश वाव्हळ ,संगीत नियोजन -गौरव सिंग ,ढोलकी-सचिन शिंदे यांनी वाजवली. कलाकार- छबुराव -संकेत बागल ,बाबुराव -संकेत उदगुडे ,सरदार १ ,सुकेशनी कांबळे ,सरदार २-पार्थ मढवी ,सरदार ३- ऋतुजा शिंदे ,दवंडी -सार्थ मढवी ,राजा - ओंकार शिर्के ,राणी - सिमरन वाव्हळ ,प्रधान -रेहान वाव्हळ ,व्यक्ती -गणेश बचूते ,धोबी -आयुष भोसले ,महिला - अनघा वाव्हळ. विशेष आभार -राजेश सपकाळ,इम्रान तांबोळी ,यश नवले ,प्रफुल्ल गायकवाड ,कैलास कदम ,सागर लबडे ,अभय मढवी ,केदार सुपारकर ,सुमित तेलंगे. केवळ काल्पनिक विषयांवर न बोलता वास्तवावर नाटके सादर केली जात आहेत ही बदलाची नांदी आहे असं मत अभिनय कट्ट्याचे संचालक किरण यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना मांडले.