ठाणे - आमचे खायचे आणि दाखविण्याचे दात एकच असल्याचे सांगत शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित दंत चिकित्सा शिबीराच्या उदघाटनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे बुधवारी ठाण्यात आले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्शवभूमीवर ठाण्यात आदीत्य ठाकरे आले असता पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. परंतु इतर प्रश्नांवर बोलणे त्यांनी टाळले. ठाणे पालिकेच्या वतीने आयोजित दंत चिकित्सा शिबीर निमित्त ते ठाण्यात आले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. पालिका शिक्षण विभाग आणि हेल्दी स्माईल या संस्थेच्या सहकार्याने पालिकेच्या सर्व शाळांमधील १ ली ते ५ वीच्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांसाटी दंत चिकित्साशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले मुंबईतही असे उपक्र म राबविण्यात आले आहेत. आता ठाण्यात त्याची सुरवात झाली असून लहान मुलाच्या दातांची निगा राखण्यासाठी अशा उपक्र मांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चौकट - सभागृह नेते आणि पालिका अधिकारी यांच्यात झाला वादवर्तक नगर येथील महापालिकेच्या शाळेत या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. परंतु यावेळी शाळेच्या आवारातच पालिकेच्या माध्यमातून सोलार पॅनल उभारण्यात येत आहे. परंतु त्याबाबत तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकारी मनीष जोशी यांची चांगलीच कान उघाडणी यावेळी केली.
आमचे खायचे आणि दाखविण्याचे दात एकच - आदीत्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 4:56 PM
भाजपाचा नमोउल्लेख टाळत बुधवारी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी टिका केली आहे. त्यामुळे युतीबाबत अद्यापही काही खरे नाही, असेच काहीसे त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देदंत चिकीत्सा मोहीम सुरुसभागृह नेत्यांनी केली पालिका अधिकाऱ्याची कान उघाडणी