ठाणे : गणपती विसर्जनानंतर ठाण्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतआहे. गेल्या सात दिवसांत नवीन १९७९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजघडीला शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही १७४५ वरून २६६३ वर जाऊन पोहोचली आहे. तर या कालावधीत बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे आता ९० टक्क्यांवरून ८७ टक्क्यांवर आले आहे. याच कालावधीत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार आतापर्यंत ८६४ जण दगावले आहेत. यातही जमेची बाब म्हणजे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या २६६३ रुग्णांपैकी ९४१ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या ही आॅगस्टपर्यंत कमी होताना दिसत होती. एकीकडे रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणदेखील ९० टक्क्यांवर गेले होते. परंतु, सप्टेंबर महिना उजाडला आणि कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले. ठाण्यात ३१ आॅगस्टपर्यंत १७४५ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत होते. तर ७ सप्टेंबरपर्यंत ९१८ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या आता २६६३ एवढी झाली आहे. याच कालावधीत म्हणजेच ३१ आॅगस्टपर्यंत २३,३२५ रुग्ण घरी गेले होते. तर ७ सप्टेंबरपर्यंत त्यात १११७ रुग्णांची भर पडून ही संख्या २४,४४२ एवढी झाली.
एकूणच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील मागील सात दिवसांत ९० टक्क्यांवरून ८७ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तीन टक्क्यांनी कमी आहे. या सात दिवसांत शहरात १९७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रोज २७० ते ३८० पर्यंत नवीन रुग्ण आढळत आहेत. यामध्ये माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा प्रभाग समितीत जास्त प्रमाणात रुग्ण आजही आढळत आहेत.
रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ठाण्यात २६६३ रुग्णांपैकी ९४१ रुग्ण हे घरीच उपचार घेत असून, त्यांची प्रकृ ती स्थिर असल्याची माहिती महापालिकेने दिली. तर १७२२ रुग्ण हे शहरातील विविध भागांत असलेल्या कोविड रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे घरी उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासादायकच म्हणावी लागणार आहे.