शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

ग्रामीण भागांत ७३१ शाळाबाह्य मुले

By admin | Published: April 18, 2017 3:19 AM

जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागांत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ७३१ शाळाबाह्य मुले व मुली आढळल्या आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागांत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ७३१ शाळाबाह्य मुले व मुली आढळल्या आहेत. या बालकांना त्वरित जवळच्या शाळेत दाखल केल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. परंतु, त्यांच्या शाळेत दाखल केल्याच्या दाव्यात विसंगती आढळून येत आहे. ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याखाली एकही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. यामुळे या शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना वेळीच शाळेत दाखल करत असल्याचा दावा होत आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप शिक्षण दिले जाणार आहे. त्यावर प्रत्येकी सुमारे तीन हजार वर्षभरात खर्च होणार आहे. यानुसार, या ७३१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येत आहे.कल्याण-डोंबिवली मनपासह उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे व मीरा-भार्इंदर या सहा महापालिकांमध्ये ६६४ बालके शाळाबाह्य आढळली आहेत. यामध्ये ३३६ मुलांसह ३२८ मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक नवी मुंबईत २३५, तर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १५४ बालके आढळली आहेत. विशेष म्हणजे शाळाबाह्य मुले अधिक असण्याची शक्यता असलेल्या उल्हासनगरमध्ये ४२ व भिवंडीत केवळ ४५ बालके आढळली आहे. याशिवाय, ग्रामीणमध्ये ६७ बालके असून त्यात ३० मुले आणि ३७ मुलींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)