नितिन पंडीत
भिवंडी - वीज बिल थकीत ग्राहकांसाठी शासनाने विलासराव देशमुख अभय योजना सुरु केली असून ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे अशा सर्व ग्राहकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पावर कंपनीने नागरिकांना केले आहे.
३१ डिसेंबर २०२१ पूर्वी ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे अशा ग्राहकांनी वीज बिलाच्या रकमेतील ३० टक्के रक्कम भरून बिनव्यजी सहा हफ्त्यांमध्ये थकीत वीज बिल ग्राहकांना भरता येणार असून थकीत बिलावरील विलंब शुल्क व व्याज माफ होणार आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत थकीत व खंडीत वीज पुरवठा ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त नागतिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन टोरंट पावर कंपनीकडून करण्यात आले आहे.
ज्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे थकीत वीज बिल आहे त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेता येईल तसेच तसेच या योजने दरम्यान ग्राहकाने चालू बिला सोबत सहा महिन्यांचा मासिक हप्ता नियमितपणे भरणे आवश्यक आहे, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल आहि माहिती टोरंट पावरचे जन संपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली आहे.