उल्हासनगर : शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी अनभिज्ञ असून होर्डिंग्स लावण्याचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिल्याचे उघड झाले. होर्डिंग्सचे दरवर्षी स्ट्रॅक्टरल ऑडिट होत असल्याची माहिती ठेकेदार देत असलेतरी त्यातील किती होल्डिंग वैध व अवैध आहेत. यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील होर्डिंग्स लावण्याचा ठेका विविध खाजगी ठेकेदाराला दिला असून ठेकेदार दरवर्षी होर्डिंग्सचे स्ट्रॅक्टरल ऑडिट करतात. असे महापालिका अधिकारी व ठेकेदारांचे म्हणणे आहे. महापालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांच्याशी होल्डिंग बाबत संपर्क केला असता, त्यांनी माझी नवीन नियुक्ती असल्याचे सांगून याबाबत माहिती घेऊन देतो. असे म्हणाले. तर या संबंधित अधिकारी विनोद केणी यांच्या सोबत संपर्क केला असता, संपर्क झाला नाही. महापालिकेने पवन ऍडवर्डटाझिंग कंपनीला ४० तर इतर ३ कंपन्यांना ३५ पेक्षा जास्त होल्डिंगचे अधिकार दिले आहे.
होर्डिंग्सची सर्व जबाबदारी खाजगी ठेकेदाराना दिली असून त्यापासून महापालिकेला नाममात्र उत्पन्न मिळत असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहे. मात्र शहरात लावलेले होल्डिंग सुरक्षित आहेत का? त्यातील वैध व अवैध किती? याबाबत प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे. तर एका ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी होल्डिंगचे स्ट्रॅक्टरल ऑडिट करून, त्याचा अहवाल महापालिकेला देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र महापालिका प्रशासन होल्डिंग बाबत काहीएक बोलत नाही.