ठाणे : सोमवारी जिल्ह्यातील ठाणे, मीरा भार्इंदर आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. दिवसभरात जिल्ह्यात ३९८ बाधितांसह १४ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा आठ हजार ६६५ तर मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे.
सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १६४ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा तीन हजार १९६ तर मृतांचा ९४ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिकेत ८० रुग्णांच्या नोंदीसह दोन जणांचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा दोन हजार २८४ तर, मृतांची संख्या ७५ वर पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवलीत ६२ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ९६ तर मृतांचा आकडा ३१ इतका झाला. मीरा भार्इंदरमध्ये १९ रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्यूने बाधितांचा आकडा ७५७ तर मृतांचा आकडा ३१ वर गेला आहे. भिवंडीमध्ये १८ रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा १६५ तसेच मृतांचा आकडा ११ झाला आहे.
उल्हानगरमध्ये २० रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ३८० झाला. बदलापूरमध्ये चार रुग्णांची नोंदीने बाधितांचा आकडा २२९ झाला. अंबरनाथमध्ये २२ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण भागात १० रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ३७१ झाला.