मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, मंगळवारी रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली. एका दिवसात १०७ रुग्ण सापडले असून, एकाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात बहुतांश नगरसेवक, राजकारणीच मास्क न घालता मोकाट फिरत असून, त्यांच्यावर पोलीस आणि पालिका कोणतीच कारवाई करत नाही. परंतु सामान्य नागरिकांवर मात्र मास्क न घातला असल्यास दंड वसुली आणि गुन्हा दाखल केला जात आहे. नगरसेवक, राजकारणी यांनी उलट जबाबदारीने नियमांचे पालन करणे आवश्यक असताना त्यांच्याकडूनच सर्रास उल्लंघन केले जात आहे.
मास्क न घालता फिरणाऱ्यांवर सरसकट ठोस कारवाई होत नसल्याने आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला लागली आहे. मंगळवारी एका दिवसात १०७ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ८०७ झाली असून, एकूण कोरोना रुग्णांची संख्या २६ हजार ४३६वर पोहोचली आहे.