शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:30 AM

उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते.

ठाणे/मुरबाड : उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते. सध्या मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना सोनगाव, सोनवळे भागांतील ओढे, नाले आणि विहिरींना मुबलक पाणी आहे. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील रोटरी समूहाने गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर काँक्रि टचा बंधारा बांधला आणि गावांचे भाग्यच बदलले. या बंधाºयामुळे एरव्ही फेब्रुवारी-मार्चमध्ये आटणाºया गावाबाहेरील ओढ्यात आता मे महिन्याच्या अखेरीसही ओसंडून वाहण्याइतका पाणीसाठा आहे. वाहते पाणी अडल्यामुळे भूजलसाठा वाढून गावातील विहिरीत बारमाही पाणी टिकू लागल्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण बंद झाली.पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला, तरी फेब्रुवारी महिन्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. कारण, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले फेब्रुवारीपर्यंत आटतात. ठिकठिकाणी काँक्रिटचे बंधारे बांधून ते पाणी अडवले तर जवळच्या वस्तीला त्याचा उपयोग होऊ शकतो, हे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. रोटरीच्या वतीने ठाणे-पालघर जिल्ह्यात ४०० अधिक काँक्रि टचे बंधारे बांधले. त्यापैकी ५४ बंधारे मुरबाड तालुक्यात असल्याची माहिती जलतज्ज्ञ हेमंत जगताप यांनी दिली. ग्रामीण भागात सुलभपणे पाणी उपलब्ध होण्यासाठी छोटे बंधारे उपयुक्त ठरत असल्याचे गेल्या १० वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. बंधाऱ्यांमुळे शेतकºयांना दुबार पीक घेता येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागत नाही. भूजलपातळी वाढून गावातील विहिरीतून अधिक काळ पाणी मिळते. गावकºयांनी श्रमदान करून दर तीन वर्षांनी बंधाºयातील गाळ काढल्यामुळे मुबलक पाणी मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.>भेंडीचा शेतकºयांना आधारया भागातील शेतकरी पावसाळ्यानंतर पाण्याअभावी त्यांच्या जमिनीत कोणतेही पीक घेऊ शकत नव्हते. मात्र, आता या बंधाºयामुळे ओढ्यानाल्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध असल्याने ग्रामस्थ कडधान्य तसेच भाजीपाला लागवड करू लागले आहेत. सोनगाव, सोनवळे परिसरातील अनेक शेतकरी पावसाळ्यानंतर सेंद्रिय पद्धतीने भेंडीलागवड करू लागले आहेत. सेंद्रिय भेंडीला बाजारात चांगली मागणी असते. नवी मुंबईतील व्यापारी गावात येऊन ही भेंडी घेऊन जातात. नुकत्याच संपलेल्या हंगामात या पंचक्र ोशीतील शेतकºयांनी सुमारे दोन कोटी रुपयांची भेंडी विकली. या पिकाने शेतकºयांना एका हंगामात एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.>जलवाहिन्यांद्वारे पाणी : सोनगावात कूपनलिकेला चांगले पाणी आहे. त्याद्वारे गावातील पाच घरांमध्ये जलवाहिन्या टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसातील ठरावीक वेळी हे पाणी घरांना उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे आणखी कूपनलिका खोदून गावातील अन्य घरांमध्येही नळपाणीयोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती रमेश भोईर यांनी दिली.