शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

ओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 8:15 PM

आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही.

ठळक मुद्देआंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाहीसंरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजचपण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही

ठाणे : दलित व मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी एमआयएमचे असरूद्दीन ओवेसी आणि भारीपचे प्रकाश आंबेडकर एकत्र आले. पण दलित आणि मुस्लिम त्यांच्या दोघांबरोबरही नाही. यामुळे त्यांचा काहीही फायदा होणार नाही. देशाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसणार नसल्याचे केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे येथे स्पष्ट केले.आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि  मुस्लिम ओवसी यांच्या बरोबरही नाही. दलित व मुस्लिम दोन्ही माझ्या बरोबर आहे. यामुळे एकत्र येऊनही या दोघांचा फायदा होणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले.देशाच्या संरक्षणासाठी ३० हजार कोटींचे राफेल हे लढावू विमान खरेदी करण्याची गरजच होती. त्याच्या खरेदीसाठी एखाद्या कंपनीची मध्यस्थिती आवश्यकच होती. अनिल अंबानीच्या कंपनीने ती मध्यस्थि केली. त्यात त्यांचाफायदा झाला. तो त्यांना मिळावा असा काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू नव्हता. राफेल खरेदीची बदनामी करण्यासाठी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यापासून खासदार राहूल गांधी परत परत तोच तोच मुद्दा काढून टिका करीत आहे. पण ही टिका मोंदींना पचवण्यार असून राहूल गांधींना त्याचा काही फायदा होणार नाही. या लढावू विमानांचा फायदा आता पाकिस्थानशी युध्द करण्यासाठी होणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांना १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रयत्न करीत आहेत. पण आरक्षणाचा हा मुद्दा न्यायालयात टिकरणार नाही. घटनेनुसार ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. यामुळे आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकणार नाही. मराठ्याना आरक्षण देण्यासाठी प्रथम लोकसभेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करायला पाहिजे. तरच आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकेल. मराठ्यांन प्रमाणेचेगुजरात, हरिणात आदी ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. त्यांनाही या कायद्यामुळे आरक्षण मिळवून देता येणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदर उदयन राजे यांच्या भेटीसही खासदार राजू शेट्टी यांची कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी, पेट्रोल- डिझेल भाव वाढ कमी करण्यासाठी केंद्र व राज्यांनी कर कमी करणे, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील हिंदुराष्ट्र विषयीचा चांगला बदल, राम मंदीर आदी विषय आठवले यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेthaneठाणे