शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

Coronavirus: ठाण्यात ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली; दोन प्रकल्पांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:18 PM

दोन प्रकल्पांचे नियोजन : शासकीय, खासगी रुग्णालयांनाही पुरेसा पुरवठा सुरू असल्याचा दावा

अजित मांडकेठाणे  : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम अधिक दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यावर ऑक्सिजन तुटवड्याची वेळ आली होती. परंतु यामध्ये सुदैवाने काही हानी झालेली नाही. परंतु आता या तुटवड्यावर मात करण्यासाठी ठाणे  महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट उभारण्याचे पालिकेने निश्चित केले असून त्याचे कामही सुरु झाले आहे. शिवाय रोजच्या रोज पुरेसा ऑक्सिजनचा साठा आता उपलब्ध होऊ लागला आहे. तर खाजगी रुग्णालयांनाही आता पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. 

महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख १२ हजार ७६९ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर ९७ हजार ९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातही केली आहे. शहरात आतापर्यंत १ हजार ५९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १४ हजार १४२ एवढी आहे. दोन महिन्यांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. रोज १२९९ ते १५०० रुग्ण सध्या शहरात आढळत आहेत. पहिल्या लाटेत हेच प्रमाण रोजचे १०० ते ३०० च्या आसपास होते. मृत्यूदर काहीसा वाढल्याचे दिसत आहे. त्यातही सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १४ हजार १४२ रुग्णांपैकी १० हजार २९२ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. तर ३ हजार ४११ रुग्ण हे विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यामध्ये १८२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ६५२ रुग्ण क्रिटिकल आहेत. तर ४७० रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. 

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात आजच्या घडीला २५० खाजगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खाजगी कोविड रुग्णालये आहेत. तर ५० नॉन कोविड रुग्णालयातही कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खाजगी रुग्णालयांना सध्या ऑक्सिजन मिळावा यासाठी धावपळ करावी लागत आहे.

शहरातील या खाजगी रुग्णालयांना रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ४६ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. पहिल्या लाटेत मात्र यापेक्षा अर्ध्या प्रमाणातच ऑक्सिजन लागत होते. त्यातही प्रत्येक रुग्णालयात रोजच्या रोज शिल्लकही राहत होता. परंतु आता दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठाही दुपटीने वाढला आहे. रोज पुरवठा होत असल्याने रुग्णांलयाकडे शिल्लक साठा नाही. परंतु सध्या पुरेसा साठा असल्याचे पालिका, खाजगी रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे. -संबंधित वृत्त/४

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनthaneठाणे