पंकज रोडेकर ठाणे : वाढत्या वायुप्रदूषणामुळे ऑक्सिजनची पातळी दिवसेंदिवस घसरत असताना ठाणेरेल्वेस्थानकात देशातील दुसरे आॅक्सिजन पार्लर सुरू केले जात आहे. १८ वेगवेगळ्या प्रकारची झाडे येथे ठाणेकरांना शुद्ध हवेचा पुरवठा करणार आहेत.
रेल्वेस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी तत्काळ आॅक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी आॅक्सिजन पार्लर ही संकल्पना नावरूपाला आली आहे. ठाण्यापाठोपाठ कल्याण आणि दादर या स्थानकांत असेच पार्लर उभे राहणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
ए-१, अॅग्रो वर्ल्ड आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देशातील पहिले आॅक्सिजन पार्लर अलीकडेच नाशिक रोड रेल्वेस्थानकात सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर, ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकातही आॅक्सिजन पार्लर सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. ए-वन अॅग्रो वर्ल्डचे अमित अमरीतकर यांनी ठाण्याला भेट देऊन पार्लरसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली आहे. पार्लर उभारण्यासाठी लागणाºया २५ बाय १० फूट जागेपेक्षा जास्त जागा ठाणे रेल्वे प्रशासनाने देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. ‘नासा’च्या वतीने अंतराळात सोडण्यात येणाºया यानातून तेथे गेल्यावर आॅक्सिजनची पातळी कमी झाल्यावर अंतराळवीरांना, ज्या झाडांपासून आॅक्सिजन मिळतो, अशी झाडे या पार्लरमध्ये लावणार आहेत. ही झाडे घरातही ठेवणे शक्य आहे. यामध्ये स्रेक प्लान्ट, चायनीज बांबू, झामिया आणि झेड प्लान्ट यासारख्या १८ प्रकारची झाडे असणार आहेत. यापैकी एक झाड १० बाय १० फुटांमधील हवा शुद्ध करते. तसेच २४ तास आॅक्सिजनचा पुरवठा करते. शिवाय, या झाडांना आठ दिवसांतून एकदा पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर ही झाडे विषारी वायू शोषून तेथे आॅक्सिजनची निर्मिती करते. त्यामुळे हे पार्लर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.आॅक्सिजन पार्लरबाबत दोन बैठका पार पडल्या आहेत. जागाही निश्चित केली असून त्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठवला आहे. - राजेंद्र वर्मा, डायरेक्टर, ठाणे रेल्वेस्थानक
ठाणे रेल्वेस्थानकात जागा निश्चित झाली आहे. तसेच ही झाडे शंभर रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत नाशिक येथे उपलब्ध आहेत. २०२५ पर्यंत संपूर्ण देशभरात याचा प्रचार करायचा आहे. हे सामाजिक कार्य असून घरातील प्रत्येक कोपºयात ठेवण्याकरिता झाडे निश्चित केली आहेत. यातील काही झाडे विदेशांतूनही मागवावी लागतात. तसेच काही झाडे ही भारतात उपलब्ध होत आहेत. - अमित अमरीतकर, ए-वन अॅग्रो वर्ल्ड