शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

पाडवा, भाऊबीजेकरिता मोबाइल, ज्वेलरीलाच पसंती

By admin | Published: November 12, 2015 1:24 AM

यावर्षी पाडव्याला पतीने-पत्नीला किंवा भाऊबीजेला भावाने बहिणीला भेट देण्याकरिता सर्वाधिक पसंती ही मोबाईलला दिली आहे.

भाग्यश्री प्रधान,  ठाणेयावर्षी पाडव्याला पतीने-पत्नीला किंवा भाऊबीजेला भावाने बहिणीला भेट देण्याकरिता सर्वाधिक पसंती ही मोबाईलला दिली आहे. त्यानंतर ज्वेलरीचा नंबर लागत असल्याने ठाणे, डोंबिवली व कल्याण येथील मोबाईल स्टोअर्स आणि ज्वेलरी शॉपमध्ये झुंबड उडालेली आहे.ओवाळणी म्हणून द्यावयाची वस्तू (मोबाईल, ज्वेलरी) खरेदी करण्यासाठी बाजारात पती-पत्नी व भगिनी आणि भाऊराया यांनी गर्दी केली आहे. इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंमध्ये ठाणे - डोंबिवली शहरांमध्ये सर्वात जास्त पसंती मोबाईल फोन्सला असून ७५ टक्के पतीराज आपल्या पत्नीला मोबाईल गिफ्ट देत असल्याने सध्या मोबाईल शॉपमध्ये पाय ठेवायला जागा नाही. अ‍ॅपलच्या महागड्या मोबाईलपासून अगदी साध्या गॅजेट्सची मागणी वाढलेली असल्याचे ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील दुकानदारांनी संगितले.डोंबिवलीतल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानदाराने सांगितले की, ६० टक्के विक्री मोबाईल फोनची होत असून एलईडीला ३० टक्के मागणी आहे. १० टक्के मागणी इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना आहे. मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्यानंतर ज्वेलरी व डिझायनर साड्या यांना पसंती असल्याचेही दिसून आले. त्याचबरोबर बंधूराज आणि पतीराजांकडून सोन्याच्या दागिन्यांबरोबरच वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीला जास्त प्रमाणात मागणी असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. हे वन ग्रॅम गोल्डचे दागिने ५०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या सर्वत्र चेन स्रॅचिंग होत असल्याने तसेच तत्सम घटना घडत असल्याने सोन्याच्या दागिन्यांपेक्षा तत्सम दिसणाऱ्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. अनेक युवती, स्त्रिया दररोज रेल्वेने प्रवास करतात. दुचाकीवरून जा-ये करतात अशावेळी सुरक्षितता म्हणून शुद्ध सोन्याची चेन अथवा कानातले घालण्यापेक्षा एक ग्रॅम सोन्याचे दागिने घालण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच भाऊबीजेला या दागिन्यांना मागणी आहे. आर्टीफिशअल इअरींग्जचा ट्रेंड खूप जोरात आहे. झुमके, बांगड्या आदी गोष्टींनाही मागणी आहे. ते १५० ते २०० रुपयाला मॉल्समध्ये उपलब्ध आहेत.बहीण किंवा पत्नीसाठी साडी अथवा ड्रेस ही खरेदी तर ठरलेली असतेच मात्र ती दिवाळीची आणि ओवाळणी म्हणून काहीतरी वेगळी वस्तू देण्याचा नवा ट्रेण्ड सध्या सुरु झाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ तेजीत आली आहे. मायक्रोवेव्ह पासून ते इंडक्शन प्लेटस् आणि त्याची भांडी यांचीही बाजारपेठ सध्या अत्यंत जोरात आहे.