वाडा : तालुक्यातील सांगे गावात गेल्या आठवड्यात रेड्यांच्या झुंजी आयोजित केल्या होत्या. यावेळी प्राण्यांना निर्दयपणे वागवल्याने तसेच मनाई आदेश झुगारून स्पर्धा भरवल्याने आयोजक व स्पर्धकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगे गावात शनिवारी झुंजीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक ३१ हजार, द्वितीय २१ हजार तर छोट्या गटासाठी प्रथम पारितोषिक ११ हजार तर द्वितीय पारितोषिक ८ हजार रोख आणि आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.मात्र, कायद्यानुसार झुंजीवर बंदी असतानाही तसेच राममंदिर बाबरी मशीद निकालाबाबत मनाई आदेश असतानाही आयोजकांनी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी १५ आयोजकांसह तीन स्पर्धकांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाड्यात रेड्यांच्या झुंजीप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:00 AM