पालघर : पालघरच्या प्रारुप विकास आराखडा हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने आराखडा विरोधी संघर्ष समितीची बैठक घेण्याच्या एक वर्षापूर्वीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी सर्वपक्षीयांनी निषेध मोर्चा काढला होता. आज संपूर्ण पालघर शहरातील दुकाने व रिक्षा बंद ठेवून शहरवासियांनी त्याला पाठींबा दर्शविला होता.पालघर नगरपरिषदेचा प्रारुप विकास आराखडा हा शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांवर अन्यायकारक असल्याने हा आराखडा रद्द कररावा यासाठी टेंभोडे, अल्याळी, नवली, वेवुर, घोलविरा, गोठणपुर, परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी अनेकदा मोर्चे, निदर्शने तसेच बेमुदत उपोषणाद्वारे आपला रोष व्यक्त करून शासन दरबारी निवेदनाद्वारे पोहचविण्याचे काम केले होते. नगरपरिषद क्षेत्रासाठी २१ मार्च २०१३ रोजी हा आराखडा प्रसिद्ध झाला. त्यातील जमीन वावर नकाशा प्रत्यक्ष सर्व्हेक्षण न करताच बनविण्यात आल्याने हा नकाशा सदोष होता. प्रारूप आराखड्यात जी आरक्षणे टाकण्यात आली ती पूर्णपणे लहान शेतकऱ्यांच्या जमिनीवरच. गृहसंकुलाना मनमानी परवानगी देतांना त्यांना आरक्षणातून, पूर्णपणे वगळण्यात आल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी आराखड्याला प्रारंभापासूनच विरोध दर्शविला होता. या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्यात आलेल्या उपोषणावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शासनाने या प्ररकणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक तोडगा काढणार असल्याचा निरोप दिल्याने विश्वास ठेऊन आपले उपोषण मागे घेतले होते. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी आमदार कृष्णा घोडा, आ. हितेंद्र ठाकूर यांनीही १०एप्रिल २०१५ रोजी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आपण या प्रारूप आराखड्यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून दुरूस्त्या करू अथवा रद्द करू असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी) वर्ष झाले पालघरवासीय करता आहेत प्रतिक्षामुख्यमंत्र्यांना आपल्या अश्वासनाचा वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही विसर पडला असून अजूनही त्यांनी याबाबत कुठलाही तोडगा न काढल्याने आज प्रारूप विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील, रोशन पाटील, प्रदीप पाटील, योगीता पाटील, इ. सह नगराध्यक्षा प्रियंका पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनील गावड, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, बाबा कदम, अस्लम मणीयार, प्रितम राऊत, बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सेवा जिल्हा प्रतीम राऊत, बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सेना जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे, भाजपाच्या लक्ष्मीबेन हजारी, सिपीएमचे बबलु त्रिवेदी इ. नी मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले.
अन्याय विकास आराखड्या विरोधात पालघर बंद, मोर्चा
By admin | Published: April 12, 2016 12:25 AM