हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा ९६.७३ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तसेच, आठ तालुक्यातील २५१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, तर १३ हजार १३५ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले आहे. पालघर आणि वसई तालुक्याचा अनुक्र मे ९७.६१ आणि ९७.५६ टक्के निकाल लागला आहे. तर मोखाडा तालुक्याचा ८७.२८ टक्के सर्वात कमी निकाल आहे.दहावीच्या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून ५५ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ९६६ परीक्षार्थींपैकी ५३ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये २८ हजार ०९९ विद्यार्थी तर २५ हजार ०६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन निकालातील त्यांचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे. तर २९ हजार २२३ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी२८ हजार ९९ मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९६.१४ टक्के आहे. जिल्ह्याचा तालुकानिहाय निकालाचे विश्लेषण करता, पालघरचा ९७.६१ टक्के निकाल लागला असून अव्वल ठरला आहे. येथील सात हजार ३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १९५०विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर ४९ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. वसई तालुक्यातील २९ हजार १९० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.५६ टक्के लागला. ९ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून १२४ शाळांचा निकाल पैकीच्या-पैकी लागला.विक्र मगड तालुक्यात दोन हजार सात विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.१६ टक्के निकाल, तर १७७ विशेष प्रावीण्य आणि दहा शाळांचा शंभर टक्के निकाल आहे. डहाणू तालुक्यातील ९६.०८ टक्के असून चार हजार ८५९ विद्यार्थी उत्तीर्ण, ८०८ विशेष प्रावीण्य, २० शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.जव्हार तालुक्यातील ९५.९२ टक्के निकाल असून दोन हजार १४० उत्तीर्ण विद्यार्थी त्यापैकी १३६ जणांनी विशेष प्रावीण्य मिळवले, १७ शाळांचे सर्व विद्यार्थी पास झाले. वाडा तालुक्यातील ९५.३८ टक्के निकाल, दोन हजार ८४ उत्तीर्ण असून ४९८ विशेष प्रावीण्य गटात तर १४ शाळांचा शंभर टक्के निकाल, तलासरी तालुक्याचा ९४.२२ टक्के निकाल, तीन हजार २४४ विद्यार्थी उत्तीर्ण, ३४७ जणांनी विशेष प्रावीण्य मिळविले, १३ शाळांचे सर्व विद्यार्थी पास झाले.जिल्ह्यातील सर्वात कमी मोखाडा तालुक्याचा ८७.२८ टक्के सर्वात कमी निकाल असून एक हजार १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नऊ हजार १५४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते, आठ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८०.६१ टक्के उत्तीर्ण झाले. गतवर्षी सर्व विषयाच्या १०० गुणांच्या लेखी परीक्षा घेतल्याने निकालाचे प्रमाण कमी होते. यावर्षी लेखीसह तोंडी परीक्षा घेतल्याने निकालाचा टक्का वाढला आहे.
पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.७३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:28 AM