पालघर : गोवा येथे झालेल्या जीएफआय वेस्ट झोन इंडिया नॅशनल ग्रापलिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये पालघरच्या मुलांनी चमकदार कामगिरी करून ‘नो गी’ या प्रकारात ७ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले आहे. तर ‘गी’ या प्रकारात २ सुवर्णपदके पटकावली आहेत. पालघरच्या या मुलांनी गोव्यातील म्हापसा येथे ४ ते ६ एप्रिलदरम्यान झालेल्या स्पर्धेत देदीप्यमान यश मिळविले आहे. याआधीही या मुलांनी राज्य आणि नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविले होते व आंतरराष्ट्रीय स्पर्धेस पात्र झाले होते. कुस्तीच्या या सुधारित प्रकारात करिअरसाठी सर्वाधिक संधी उपलब्ध आहे. ‘नो-गी’ प्रकारात एंजल पाटील, वैभव मेस्त्री, शुभम भागवत, वैभव देवरे, रवी शॉ, विकास गुप्ता, जसवंत गुप्ता यांना गोल्ड मेडल मिळाले. दिनेश रावल, विवेक उपाध्याय यांना सिल्व्हर मेडल मिळाले. तर साहिल रजा याने ब्राँझ मेडल पटकावले. ‘गी’ या प्रकारात एंजल पाटील, वैभव मेस्त्री, विवेक उपाध्याय यांनी गोल्ड मेडल मिळवले.
नॅशनल ग्रापलिंग चॅम्पियनशिपमध्ये पालघरच्या खेळाडूंचे घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:37 AM