मनोर : कुर्झे येथील एक तक्रारदाराने (सुधागड) पाली तहसिलदारांनी खोटी जन्मतारीख देऊन शासनाची फसवणूक केल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करूनही गेल्या एक महिन्यापासून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसून हे तहसीलदार अद्याप कार्यरतच आहेत.पालीचे तहसीलदार व्ही. के. रोंदळ यांची जन्मतारीख जि. प. मराठी शाळा भेंडीला कळवण जि. नाशिकच्या रेकॉर्डनुसार २ जून १९५३ अशी आहे. त्यानंतर त्यांनी बापूजी बाबाजी स्मारक विद्यामंदिर चांदिप (वसई) जि. ठाणे आताचा जि. पालघर या शाळेत दि. १०/६/१९७० रोजी दाखल होतांना जि. प. शाळा भेंडी ता. कळवण, जि. नाशिक सोडतांनाची जन्मतारीख २/६/१९५३ अशी असून या शाळेचा दाखला हा बापुजी बाबाजी स्मारक विद्यामंदिर चादीप ता. वसई येथे दाखल होताना त्यांची जन्मतारीख २/६/१९५३ अशी आहे परंतु त्यानंतर यशवंतराव विद्यालय निबावणे ता. कळवण येथील महाविद्यालयात दाखल होतानांची जन्म तारीख २/६/१९५६ अशी आहे. यामुळे यापैकी कोणती जन्मतारीख खरी असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला आहे. यावरून व्ही. के. रोंदळ यांनी शाळेचे दाखल्यात खाडाखोड केलेली असून शासनाची फसवणूक करून नोकरी मिळविली आहे.
पाली तहसिलदारने केली शासनाची फसवणूक?
By admin | Published: December 09, 2015 12:33 AM