शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
3
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
4
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
5
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
6
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
7
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
8
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
9
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
10
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
11
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
12
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
13
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
14
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
15
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
17
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
18
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
19
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
20
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

कोकणातील पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

By अजित मांडके | Published: March 20, 2023 11:34 AM

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दहीहंडीचा सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला. अन् गल्लीत बालगोपाळांपुरता मर्यादीत असलेला हा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. आता कोकणातील पालखी नृत्य आपण ठाण्यात साजरा करीत आहोत. आता हा सण आणि ही पालखी नृत्याची  संस्कृती आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शिमगोत्सवात जितेंद्र आव्हाड यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नृत्य केले. या प्रसंगी आव्हाड बोलत होते. 

 म्हणाले की, कोकणी माणूस हा संस्कृती आणि गाव प्रिय असणारा माणूस आहे. आज जी मुंबई आपणाला दिसत आहे. या मुंबईला घडविण्यात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे. येथील मिलमध्ये कोकणी माणूसच आधी नोकरीला लागला. कोकणी माणूस शिमगा आणि गणपतीला जसा न चुकता गावी जातो. तसाच तो आपल्या जीवनात आणि व्यवहारातही काटेकोर आहे. कोकणी माणूस कधीच वीजबिल बुडवत नाही. कोकणी माणूस कधीच कर्ज फेडीपासून दूर पळत नाही. तसेच, शेतीवर कितीही संकटे आली तरी तो आत्महत्या करीत नाही;  तो लढतो.  

आपण जो शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेसाठी आधी उक्षीच्या ग्रामदेवतेसमोर कौल लावण्यात आला होता. देवीने कौल दिल्यानंतरच आपण येथे पालखी आणली. पुढील वर्षी पुन्हा देवीला कौल लावू आणि आज जेवढ्या उत्साहात हा महोत्सव साजरा केला. त्याच्या दुप्पट उत्साहात शिमगोत्सव साजरा करू. सलग चार दिवसांचा कोकण महोत्सव,  त्यामध्ये कोकणातील सर्वच तालुक्यांतील महत्वाच्या गावांतील पालख्या या स्पर्धेत सामावून घेऊ. ही स्पर्धा आजच्या पेक्षा अधिक भव्य दिव्य करून दहीहंडीप्रमाणेच पालखी नाचवण्याची ही संस्कृतीदेखील जगभर पोहचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावला प्रथम क्रमांक 

या ठिकाणी झालेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सुमारे अकरा संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत २ लाख १० हजार रूपयांचे पहिले पारितोषिक संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावले. दुसरे 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक राजापूरच्या रामेश्वर चिचवाडी संघाने, तिसरे 1 लाख 1 हजाराचे पारितोषिक वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक माखजन, संगमेश्वर यांनी पटकाविले.तर   श्री. नागेश्वर, रत्नागिरी (सोमेश्वर), तालुका रत्नागिरी, श्री. वाघजाई, उक्षि, ता. रत्नागिरी, सुखाई देवी, चिंचघरी, चिपळूण. तालुका चिपळूण,  जय त्रिमुख, मठ, तालुका लांजा., श्री वाघजाई देवी पालखी नृत्य पथक, तणाली, ता. चिपळूण,  जय सांबा,पाटगाव,देवरूख,तालुका संगमेश्वर, काळकाई पा. नृ. प. कुशिवडे, तालुका चिपळूण, माखजन, ता. संगमेश्वर आणि  पद्मावती , मार्गताम्हाणे, तालुका गुहागर यांना उत्तेजनार्थ 25 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड