उल्हासनगर : माझी माती, माझा देश या उपक्रमा अंतर्गत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने मिडटाऊन व गोलमैदान येथे मातीचे दिवे विक्रीस ठेवले. याउपक्रमात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत एनयूएलएम विभागाच्या बचत गटाकडून मातीचे दिवे तयार करून विक्री साठी ठेवण्यात आले होते. अनेक बचत गटांनी बनवलेले दिवे मिड टाऊन हाॅल व गोल मैदान येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी वर्गाने सदर ठिकाणी भेट देऊन दिवे खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे.
महापालिका घनकचरा वाहतूक वाहने व त्यावरील कर्मचाचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मातीची पणती घेऊन सर्वांनी सेल्फी फोटो घेतले आहे. आरोग्य विभागाद्वारे आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व करुणा जुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, महापालिका अधिकारी मनिष हिवरे, एकनाथ पवार, विनोद केणे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, जेठानंद अनिल खतुरानी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, विशाखा सावंत, बाळू नेटके, राजा बुलानी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सर्वांनी पंचप्रण शपथ घेतली आहे.