शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

परवाना नसताना उभारले रस्ते अडवून मंडप; वाहतुकीला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 8:35 PM

या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे

मीरारोड - नागरीकांना रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरु नये तसेच आपत्कालिन वेळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सहज जावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडप उभारणीस परवानगीचे आदेश दिले असताना मीरा भाईंदरमध्ये महापालिका, पोलीस यांच्या संगनमताने सर्रास रस्ते बंद करुन मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे. पण सदरच्या बैठका निव्वळ बैठका घेतल्याचे दाखवण्यासाठीचा फार्स ठेला आहे. वास्तविक रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडपसाठी परवानगी देण्याचे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. तसेच कमानी उभारण्यास देखील मनाई आहे. तरी देखील सार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.भार्इंदर पूर्वेचा जेसल पार्क, नवघर मार्ग, खारी गाव - व्यंकटेश नगर , भार्इंदर पश्चिमेचा विनायक नगर , मोदी पटेल , नारायण नगर, मीरारोड आदी शहरातील अनेक भागात रस्ते पूर्णपणे वा मंजुर रुंदी पेक्षा जास्त प्रमाणात बंद करून भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत .रस्ता बंद करुन उभारलेल्या मंडपां मुळे लोकांना पायी वाट काढणे अशक्य झाले आहे . तर अनेक ठिकाणी रस्त्यात प्रमाणा पेक्षा जास्त मंडप उभारण्यात आले आहेत. रस्ता पुर्णच बंद करुन मंडळांनी वाहतुक पुर्णपणे बंद केली गेली आहे. तर काही प्रमाणातच रस्ता खुला ठेवल्याने देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन तर सोडाच चारचाकी कार देखील जाणार नाही अशी स्थिती आहे.महापालिका आणि पोलीसांची परवानगी नसतानाच असे रस्ता बंद करुन वा जास्त रस्ता व्यापुन मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र या गंभीर बाबी कडे डोळेझाक चालवली आहे. आधी रस्ता अडवुन बेकायदा मंडप उभारणीस महापालिका व पोलीसांनी संरक्षण द्यायचे आणि मग मंडप आदी उभारुन झाले की मग मात्र कायदा सुव्यवस्थेचा मुदद्दा पुढे करुन कारवाई टाळायची असा फंडा यंत्रणेने अवलंबला आहे.अशा बेकायदा मंडप व कमानी उभणारणारयां विरोधात महापालिका गुन्हे देखील दाखल करत नाही. पोलीस सुध्दा कार्यवाही करत नाहीत. यामुळे आधीच शहरात वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडून नागरीकांना मन:स्ताप सहन करावा लागतोय. इतकेच नव्हे तर नागरीकांची सुरक्षितता देखील पालिका, पोलीसांनी वारायावर सोडली आहे. 

मंडळांना आधीपासुन आदेशांचे काटेकोर पालन करा म्हणुन सांगितलेले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात नसेल आणि रस्ते बंद वा अडवुन मंडप उभारले गेले असतील तर याचा आढावा प्रभाग अधिकाऱ्यांकडून घेऊ. कोणत्याही स्थितीत बेकायदा मंडप खपवुन घेणार नाही, अशांवर कारवाई करु. - बालाजी खतगावकर ( आयुक्त, महापालिका ) 

टॅग्स :mira roadमीरा रोडMuncipal Corporationनगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सवTrafficवाहतूक कोंडी