शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पंडित जोशी रुग्णालय चालवण्याची पालिकेवरच ओढवली नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:08 AM

करारातील अटींची पूर्तताच केली नाही : सरकारने दिला नकार, कर्मचाऱ्यांमध्ये पसरली चिंता, लोकप्रतिनिधींमध्येच आहे उदासीनता

- धीरज परब।लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिके ने बांधलेले भार्इंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हस्तांतरित करून चालवण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. महापालिकेने वर्षभरापूर्वी केलेल्या करारानुसार त्यातील शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तताच न केल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेलाच रुग्णालय चालवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने नकार दिल्यास रुग्णालय बंद पडण्याची शक्यता आहे.

गरीब नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी, म्हणून तत्कालीन जनता दल (से.) चे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाच्या तंबीनंतर पालिकेने चार मजली इमारत बांधून २०० खाटांचे रुग्णालय सुरू केले. परंतु, रुग्णालयात अत्यावश्यक असणारी आयसीयू, एनआयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सुविधाच पालिकेने उभारल्या नाहीत. चांगले डॉक्टर, आवश्यक कर्मचारीही पालिकेला नेमता आले नाही. जे कामावर रुजू झाले, त्यातील अनेकजण राजकीय व प्रशासकीय जाचामुळे काम सोडून गेले.

वास्तविक, रुग्णालय चालवण्यास महापालिका आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. त्यामुळेच हे रुग्णालय सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१६ मध्ये घेतला. त्यानंतर, २६ फेब्रुवारी २०१८ रोजी सरकारने आदेश काढून जोशी रुग्णालय पालिकेकडून हस्तांतरित करून घेत त्याला सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २५ कोटींची तरतूद करत कार्यरत ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सरकारीसेवेत समावेश करून घेत एकूण ३६५ पदांच्या निर्मितीस मान्यता दिली. २४ मे २०१८ रोजी आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक आणि महापालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यात रुग्णालय हस्तांतराचा करार करण्यात आला. करारानुसार एक वर्षापर्यंत म्हणजेच २३ मे २०१९ पर्यंत रुग्णालय चालवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. वैद्यकीय सुविधा पालिकेनेच देणे भाग आहे. २३ मे रोजी वर्ष संपायला आले, तरी पालिकेने अद्याप रुग्णालयात अत्यंत गरजेचे असणारे आयसीयू, सुसज्ज अशी चार शस्त्रक्रियागृहे व अन्य काही आवश्यक बाबींची पूर्तताच केलेली नाही.

रुग्णालय सरकारने ताब्यात घेऊन चालवावे, म्हणून महापालिकेने सतत सरकारशी पत्रव्यवहार केला. त्यातून, सरकारचे दोन डॉक्टर हजर झाले. २४ एप्रिलला आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सरकारला पत्र पाठवून २३ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने २४ मे पासून सरकारने संपूर्ण व्यवस्था पाहावी, असे कळवले होते. महापालिकेमार्फत कार्यरत असलेली साफसफाई, सुरक्षाव्यवस्था, धुलाईव्यवस्था, गर्भवतींना केली जाणारी मोफत अन्नपुरवठासेवा संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय, पालिकेने नेमलेल्या मानद डॉक्टरांच्या सेवाही संपुष्टात येणार असल्याने सरकारने डॉक्टर, कर्मचाºयांची नेमणूक न केल्यास रुग्णसेवा बंद पडण्याची भीती व्यक्त केली होती.

आयुक्तांच्या पत्रानंतर सरकारने करारातील अटींची पूर्तता पालिकेने केली आहे की नाही, हे पाहण्यासाठी ४ मे रोजी समिती स्थापन केली होती. आरोग्यसेवेच्या उपसंचालक गौरी राठोड यांच्यासह समितीने रुग्णालयात येऊन पाहणी केली आणि एकूणच आढावा घेतला होता. समितीने पाहणी करून १३ मे रोजी सरकारला अहवाल दिला असता त्यात पालिकेने कराराच्या अटींची पूर्तता केली नाही, हे स्पष्ट केले होते.

समितीच्या अहवालानंतर आरोग्यसेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी १७ मे २०१९ रोजी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून पालिकेतील ३५ अधिकारी, कर्मचारी यांच्या सरकारीसेवेत समावेशनाचा प्रस्ताव १८ मार्च २०१९ रोजी प्राप्त झाल्याने सरकारकडून मंजुरी मिळेपर्यंत ही सेवा पालिकेमार्फतच सुरू ठेवावी, असे स्पष्ट केले.इतकेच नव्हे तर अटींची पूर्तता होईपर्यंत रुग्णालय हस्तांतरित होऊ शकणार नाही, असेही पालिकेला सुनावले. सरकार रुग्णालय घेणार म्हणून पालिकेच्या आस्थापनेवरील जोशी रुग्णालयासाठी मंजूर पदे सरकारनेच रद्द केली आहेत. 

महापालिकेने करारातील अटींची अजूनही पूर्तताच केलेली नाही. त्यामुळे सरकार रुग्णालय चालवण्यास घेणार नाही. आयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सात ते आठ गोष्टींची पूर्तता पालिकेने केलेली नाही.- गौरी राठोड(उपसंचालिका, आरोग्यसेवा)